Viral Video: तरुणाने 25 लाखांसाठी केला स्वतःच्या अपहरणाचा बनाव, व्हिडीओ पाठवत कुटुंबीयांकडून केली पैशांची मागणी

अमरोहा पोलिसांनी अवघ्या आठ तासांत या प्रकरणाचा उलगडा करत नाझीम आणि त्याचा मित्र अमितला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाझिमने अमितच्या मदतीने त्याचे अपहरण घडवून आणले आणि त्याच्या चुलत भावाला एक व्हिडिओ पाठवला, व्हिडीओमध्ये तो एका खोलीच्या जमिनीवर हात-पाय दोरीने बांधलेला खाली जमिनीवर पडलेला दिसत आहे.

Young man faked his own kidnapping for 25 lakhs

Viral Video: उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातील एका विचित्र घटनेत नाझिम नावाच्या 23 वर्षीय तरुणाने आपल्या कुटुंबाकडून 25 लाख रुपये उकळण्यासाठी स्वतः च्या अपहरणाचा बनाव बनवला होता. अमरोहा पोलिसांनी अवघ्या आठ तासांत या प्रकरणाचा उलगडा करत नाझीम आणि त्याचा मित्र अमितला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाझिमने अमितच्या मदतीने त्याचे अपहरण घडवून आणले आणि त्याच्या चुलत भावाला एक व्हिडिओ पाठवला, व्हिडीओमध्ये तो एका खोलीच्या जमिनीवर हात-पाय दोरीने बांधलेला खाली जमिनीवर पडलेला दिसत आहे. त्याने चुलत भाऊ   शौकीनला अनेक संदेश पाठवून त्याच्या सुटकेसाठी खंडणीची मागणी केली होती. खंडणीची मागणी झाल्यानंतर नाझिमचे वडील आरिफ यांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्यावर ही बाब उघडकीस आली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत गुन्हा नोंदवला आणि नाझीमला शोधण्यासाठी आणि सोडवण्यासाठी तीन टीम तयार केल्या. हे देखील वाचा: Viral Video: विवाहित प्रेयसीच्या घरात प्रियकराला पकडले रंगेहाथ, लोकांनी केली बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल

तपासादरम्यान ते नजीबाबाद येथे पोहोचले, तेथे नाझीम सापडला आणि त्याचा मित्र अमितला अटक करण्यात आली. मात्र, चौकशीदरम्यान नाझीमने आर्थिक अडचणीचे कारण देत कुटुंबाकडून पैसे उकळण्यासाठी अपहरणाचा खोटा बनाव केल्याचे कबूल केले.

येथे पाहा, व्हिडीओ 

अमरोहा पोलिसांनी अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, "अमरोहा पोलिसांनी बनावट अपहरणाचे प्रकरण अवघ्या 8 तासांत सोडवले. आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या दोन मित्रांनी पैसे कमवण्यासाठी त्यांच्या मित्राचे (नाजिम) अपहरण केल्याचा बनाव केला. त्यांनी घरच्यांना  25 लाखांची मागणी केली होती.

“नाझीम आणि अमित दोघांनाही अटक करण्यात आली असून त्यांच्यावर कायद्याच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif