Tree Uprooted in Mumbai Viral Video: तौक्ते चक्रीवादळात उन्मळून पडणार्या झाडाखाली अवघ्या काही सेकंदासाठी बचावली महिला; पहा अंगावर शहारा आणणारा हा क्षण!
त्यामुळे अनेक मोठी झाडं उन्मळून पडल्यच्या घटना समोर आल्या आहेत.
काल महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीजवळून गेलेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे (Cyclone Tauktae) अनेक झाडं उन्मळून पडली. आतापर्यंत झालेल्या चक्रीवादळा दरम्यान काल वार्याचा वेग हा रेकॉर्डब्रेक होता. वारा-पावसाच्या खेळात काल अनेक लहान मोठे अपघात देखील झाले. मुंबईच्या विक्रोळी भागात अशाच एका झाड कोसळताना केवळ दैव बलवत्तर म्हणून बचावलेल्या एका महिलेचा व्हिडीओ सध्या तुफान वायरल होत आहे. काही सेकंदाचा उशीर झाला असता तर ती महिला भल्यामोठ्या कोसळलेल्या झाडाखाली दबण्याची शक्यता होती. पण झाडं उन्मळून पडत असल्याचं तिच्या लक्षात आलं आणि ती जीव मुठीत धरून पळाली. दरम्यान ही घटना सीसीटीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.
ANI कडून या सीसीटीव्ही मध्ये कैद झालेल्या वायरल क्लिप ची झलक प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामध्ये ही 17 मे 2021 ची घटना असल्याचं म्हटलं आहे. हा अंगावर शहारा आणणारा प्रसंग सध्या सोशल मीडीयात चांगलाच वायरल होत आहे. काल मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यांच्या जवळून तौक्ते चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने पुढे सरकले. आणि रात्री उशिरा त्याचा गुजरातच्या किनारपट्टीवर लॅन्डफॉल झाल्याने आता प्रभाव कमी झाला आहे. (नक्की वाचा: Fact Check: मुंबईत Trident Hotel Nariman Point परिसरात सोसाट्याच्या वार्यामुळे गाड्यांचे नुकसान झाल्याची वायरल क्लिप खोटी; पहा वास्तवातील स्थिती).
पहा अंगावर शहारा आणणारा तो क्षण
सध्या सोशल मीडीयामध्ये हा व्हिडिओ तुफान वायरल होत आहे. 27 हजारावरून अधिक लाईक्स आहेत. 200 पेक्षा जास्त शेअर आहेत. या व्हिडीओ वर अनेक रिअॅक्शन आल्या आहेत. तौक्ते चक्रीवादळामध्ये यंदा देखील कोकणाला मोठा फटका बसला आहे. मागील वर्षी देखील निसर्ग चक्रीवादळाचा कोकणाला फटका बसला होता.