Viral Video: रात्रीच्या अंधारात एक जोडपं बाईकवर कुठेतरी जात असताना समोरून आला सिंह, पुढे जे झाले ते पाहून बसेल धक्का
असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक माणूस आपल्या पत्नीसोबत बाईकवर कुठेतरी जात असताना अचानक त्याची नजर समोरून येणाऱ्या सिंहावर पडली.
Viral Video: रात्रीच्या अंधारात तुमच्या बायकोसोबत बाईकवरून कुठेतरी जात असाल आणि अचानक तुम्हाला समोर शिकारी प्राणी दिसला तर अशा परिस्थितीत तुम्ही काय कराल? जीव वाचवण्यासाठी तुम्ही तिथून पळून जाल हे साहजिक आहे. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक माणूस आपल्या पत्नीसोबत बाईकवर कुठेतरी जात असताना अचानक त्याची नजर समोरून येणाऱ्या सिंहावर पडली. समोर शिकारी सिंह दिसताच ते दाम्पत्य अस्वस्थ होते आणि त्यांना दुचाकी तिथेच सोडून पळून जावे लागते. हा व्हिडिओ गुजरातमधील गीर येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर @wildtrails.in नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओसह युजरने दावा केला आहे की, तो गुजरातमधील गीरचा आहे. यावर कमेंट करताना एका यूजरने लिहिले आहे - तो माणूस बाईक सोडून पळून गेला कारण त्याला माहित होते की, जर त्याने गाडी हलवण्यात आपला वेळ वाया घालवला तर शिकारी सिंह त्याच्यापर्यंत पोहोचेल. तर दुसऱ्याने लिहिले आहे.
सिंहाला पाहून जोडप्याला पळून जावे लागले
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये असे दिसून येते की, बाईकवरून पती-पत्नी मुख्य रस्त्यावरून कॉलनीच्या आतील रस्त्याकडे वळतात, मात्र पुढच्याच क्षणी त्यांना रस्त्यात सिंह दिसला. पुरुषाला काही समजण्याआधीच दुचाकीवर मागे बसलेली महिला खाली उतरली आणि पळू लागली. यानंतर तो व्यक्तीही बाईक तिथेच सोडून जीव वाचवण्यासाठी तेथून पळतो.