Credit-(Instagram,MUMBAI BREAKING NEWS 24×7)

Viral Video: भारतीय रेल्वेतून दररोज लाखो लोक प्रवास करतात. अनेक जण काही तास प्रवास करतात, तर अनेक प्रवासी अनेक दिवस ट्रेनमधून प्रवास करतात. या काळात दुसरा कोणताही पर्याय नसल्याने लोक रेल्वेत विकले जाणारे चहा-नाश्ता खाऊन जगतात. रोज शेकडो लोक विचार न करता ट्रेनमध्ये विकला जाणारा चहा पितात, कारण त्यांच्याकडे पर्याय नसतो आणि हे लोक आपल्या घरापासून दूर असतात. लोक आनंदाने पिणारा चहा कसा बनवला जातो याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही ट्रेनमध्ये विकला जाणारा चहा पिणे तुम्ही बंद कराल. मुंबई ब्रेकिंग न्यूज 24×7 नावाच्या हँडलसह हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे.

इमर्शन रॉडपासून चहा बनवला जात आहे

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ज्या इमर्शन रॉडमधून लोक पाणी गरम करतात त्यापासून चहा बनवला जात आहे. हा चहा प्यायल्यानंतर अनेक जण आजारी पडू शकतात. पण रेल्वेला किंवा चहाविक्रेत्याला त्याची पर्वा नाही.

व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी नाराजी केली व्यक्त 

58 हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक जोरदार कमेंटही करत आहेत. एकाने लिहिले की, रेल्वे प्रशासन त्यांच्यावर कारवाई का करत नाही? आणखी एकाने लिहिले की, "मी ट्रेनमध्ये कधीच चहा किंवा काहीही खात नाही. तिसर् याने लिहिले की, "आजपासून ट्रेनमध्ये चहा पिने थांबला. यावर लोकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे.