Viral Video: वर्गात शिकवत असताना शिक्षक अचानक झोम्बीसारखा वागतो, पुढे जे झाले ते पाहून बसेल धक्का

पण कधी-कधी असे काही व्हिडीओ असतात जे पाहून लोक आश्चर्यचकित होतात. दरम्यान, सध्या एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक शिक्षक विचित्र वागू लागतो. व्हिडिओत दिसणारा माणूस भौतिकशास्त्र शिकवत होता. व्हायरल व्हिडिओची सुरुवात एका व्यक्तीने होते.

Viral Video

Viral Video: सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक व्हिडिओ व्हायरल होतात आणि ते व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक खूप हसतात. पण कधी-कधी असे काही व्हिडीओ असतात जे पाहून लोक आश्चर्यचकित होतात. दरम्यान, सध्या एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक  शिक्षक विचित्र वागू लागतो. व्हिडिओत दिसणारा माणूस भौतिकशास्त्र शिकवत होता. व्हायरल व्हिडिओची सुरुवात एका व्यक्तीने होते. चेहऱ्यावर हात चोळल्यानंतर तो विद्यार्थ्यांकडे वळतो आणि विचित्र आवाज करू लागतो. व्हिडिओमध्ये माणूस हसताना, ओरडताना आणि वेगवेगळे हावभाव करतांना दिसत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये यासंबंधी कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही मात्र हा व्हिडिओ अजूनही व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म X वर @veejuparmar नावाच्या खात्यावरून पोस्ट करण्यात आला आहे. "भौतिकशास्त्र शिकवताना विचित्र चाळे," असे कॅप्शन व्हिडिओला दिले. हा व्हिडिओ आतापर्यंत 5,000 हून अधिक लोकांनी पाहिला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर, एका वापरकर्त्याने लिहिले, "क्वांटम भौतिकशास्त्राकडे वळले," तर दुसऱ्या X वापरकर्त्याने लिहिले, "न्यूटनचा आत्मा आत आला." तिसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, "तर ते विज्ञानाच्या पलीकडे आहे."