Mumbai-Goa Tejas Express ला यंदा Christmas निमित्त खरंच रोषणाई? जाणून घ्या सोशल मीडीयात वायरल व्हिडिओ मागील सत्य
2017 साली सुरू करण्यात आलेली ही ट्रेन पहिली हाय स्पीड लक्झरी प्रिमियर ट्रेन आहे.
सोशल मीडीयामध्ये खोट्या बातम्या, फेक व्हिडिओ झपाट्याने वायरल होत असतात. सध्या सोशल मीडीयामध्ये एका रेल्वे ट्रेनला रोषणाई केल्याचा व्हीडिओ खूप चर्चेमध्ये आहे. काहींनी ही रेल्वे तेजस एक्सप्रेस (Tejas Express) असून मुंबई ते गोवा दरम्यान धावणारी ही सुपरफास्ट एक्सप्रेस ख्रिसमस (Christmas) निमित्त खास सजवली असल्याचा दावा केला आहे. मात्र ही गोष्ट खोटी आहे. रोषणाई केलेला हा व्हिडिओ भारतातील नसून England मधला असल्याचं फॅक्ट चेक मध्ये समोर आलं आहे.
दरम्यान तेजस एक्सप्रेस ही मूळात पॉवरफूल डिझेल इंजिन असलेली ट्रेन आहे. 2017 साली सुरू करण्यात आलेली ही ट्रेन पहिली हाय स्पीड लक्झरी प्रिमियर ट्रेन आहे. तर व्हिडिओ मध्ये दिसत असलेली ट्रेन ही स्टीम इंजिन वर धावत आहे. त्यामुळे तेजस एक्सप्रेसच्या नावाखाली लंडन मधली ट्रेन दाखवली जात असल्याचं समोर आले आहे. हे नक्की पहा: मुंबई मध्ये New Year Celebrations साठी Bandra Reclamation वर रोषणाई; पाहा ‘बांद्रा वंडरलँड’ ची झलक .
तेजस एक्सप्रेसच्या नावाखाली सोशल मीडीयात वायरल होत असलेला व्हीडिओ
लंडन मधला फेसबूक वर पोस्ट केलेला मूळ व्हिडिओ
Scott Williams या फोटोग्राफरने 24 नोव्हेंबरला लंडन मधील ट्रेनचा व्हिडीओ शेअर केला आहे. ही Train of Lights आहे. साऊथ वेस्ट इंग्लंड मध्ये Dartmouth Steam Railway कडून दरवर्षी ख्रिसमसच्या सुमारास चालवली जाते. यंदा 24 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर 2021 दरम्यान ही ट्रेन प्रवाशांसाठी खुली आहे. त्यामुळे सोशल मीडीयात लाईटिंग केलेली ट्रेन तेजस एक्सप्रेस आहे असा मेसेज तुम्हांलाही आला असेल तर त्यावर विश्वास ठेवू नका. सध्या कोकण रेल्वे मार्गावर वेळापत्रकानुसारच नेहमीप्रमाणे ट्रेन चालवल्या जात आहेत.