Viral Video: बिहारच्या छपरा गावात नर्सचा अजब प्रताप, माणसाला दिले रिकामे इंजेक्शन (Watch Video)
व्हिडिओ बिहारच्या छपरा या गावचा आहे.येथे एका नर्सने कोरोनाचे असे इंजेक्शन दिले आहे ज्याची तुम्ही कल्पना ही करू शकत नाही.
देशभरात कोरोना लसीकरण केले जात आहे.लसीकरणाचे नव नवे रिकॉर्ड ही आता होत आहेत. याच दरम्यान लसीकरण करतानाचा एक विचित्र व्हिडिओ समोर आला आहे जो पाहुन तुम्ही चक्रावून जाल. व्हिडिओ बिहारच्या छपरा या गावचा आहे.येथे एका नर्सने कोरोनाचे असे इंजेक्शन दिले आहे ज्याची तुम्ही कल्पना ही करू शकत नाही. (Mumbai: गोरेगाव येथील Nesco कोविड सेंटरच्या वर्षपूर्तीनिमित्त आरोग्यसेवकांचे रुग्ण वॉर्डमध्ये नृत्य (Watch Video) व्हिडिओमध्ये असे दिसून आले आहे की, एक नर्स माणसाला इंजेक्शन देत आहे. ती इंजेक्शनमध्ये कोरोनाचे वॅक्सीन भरत नाही आणि तसेच इंजेक्शन देऊन मोकळी होते. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी बिहारच्या आरोग्य विभागाला ट्रोल करण्यास सुरुवात केली. हा व्हिडिओ आता बर्याच सोशल मीडिया हँडल्ससह शेअर केला जात आहे.
या प्रकरणाची चर्चा होऊ लागल्यावर लस देणाऱ्या नर्स चंदा देवीला लसीकरणाच्या कामातून काढून टाकण्यात आले आहे. आणि याचा जाब विचारल्यावर,''लसीकरण केंद्रावर खूप गर्दी होती ज्यामुळे ही चूक झाली'' असे चंदा देवी म्हणाल्या आहेत. पटनामध्ये काही दिवसांपूर्वीच असेच एक प्रकरण समोर आले होते. जिथे एकाच मुलाला दोन लस देण्यात आल्या होत्या.