Viral Video Of Ducklings: बदक आणि त्याच्या पिल्लांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, तुम्ही पाहिलात?
Viral Video Of Ducklings | | (Photo Credits: Twitter)

सोशल मीडियावर (Social Media) एक बदक (Duck) आणि त्याच्या पिल्लांचा (Ducklings) व्हिडिओ भलताच व्हायरल (Viral Video) झाला आहे. अनेक लोक हे बदक आणि त्याच्या पिल्लांच्या प्रेमात पडले आहेत. अनेकांना हा व्हिडिओ हृदयस्पर्षी वाटतो. तर अनेकांनी हा व्हिडिओ पाहून Wow वाली फीलिंग दिली आहे. आपणही हा व्हिडिओ (Viral Video Of Ducklings) पाहाल तर कदाचित आपल्याही मनात काहीशी अशीच भावना निर्माण होऊ शकते. हा व्हिडिओ एका युजरने ट्विटरवर शेअर केला आहे. आपणही हा व्हिडिओ येथे पाहू शकता.

ट्विटरवर This profile will makes you happy नामक पेजवर @Profilecure या यूजरने शेअर केलेल्या व्हिडिओत एक मोठे बदक आणि त्याची जवळपास 10 पिल्ले दिसतात. जी रस्ता ओलांडण्याची धडपड करत आहेत. पिल्ले रस्ता ओलांडत असल्याचे पाहून रस्त्यावरील वाहन चालक आणि पादचारीही काही काळ थांबतात. जसे काही सिग्नलच लागला आहे असे वाटावे इतकी रहदारी थांबेलेली पाहायला मिळते. सर्व रस्ता शांत. अखेर बदक आपल्या पिल्लांसोबत रस्ता पार करते. पण, इथेच त्यांचा संघर्ष थांबत नाही. (हेही वाचा, Cubs Of Tiger From Melghat Video: मेळघाटात वाघाचे गोंडस बछडे घालतायत पर्यटकांना भूरळ; पाहा 'हा' सूपर क्यूट व्हिडिओ)

व्हिडिओ

बदक आणि त्याच्या पिल्लांना तलावात जायचे असते. पिल्ले तर नाजूक आणि खूपच लहान असतात. त्यामुळे त्यांना रस्त्यालगतचा फुटपात पार करता येत नाही. त्यामुळे पुढे गेलेले आणि त्यांना दिशा दाखवणारे बदक काहीसे कासाविस होते. अखेर रस्त्यावरील पादचारी या पिलांना उचलून पादचारी मार्गावर ठेवतात. मग ही पिले शाळेतील गुणी मुलांप्रमाणे एका पाठोपाठ एक अशी रांगेनेच पुढे पुढे जातात. आणि हळूच तलावात उतरतात. त्यांना तलावात उतरल्याचे पाहून उपस्थित नागरिकांनी टाळ्या वाजवून आणि ओरडून आनंद व्यक्त केल्याचे व्हिडिओत पाहायला मिळते. आपणही हा क्यूटशा बदकांचा व्हिडिओ पाहू शकता.