Crab Smoking Cigarette: सिगरेट च्या पाकीटावर धुम्रपानाने कॅन्सर होण्याचा सल्ला देणारा खेकडाच स्वतः दिसला स्मोकिंग करताना, Watch Video Viral
या व्हिडिओ पाहिल्यावर ट्विटर युजर्सला सिगरेटच्या पाकिटावरील खेकड्याची आठवण झाली. जो धुम्रपानाने कॅन्सर होतो असा सल्ला देतो.
आपल्यापैकी कित्येकांनी सिगरेटच्या (Cigarette) पाकिटावर धुम्रपानाने कॅन्सर (Cancer) होण्याचा सल्ला देणारा खेकडा (Crab) पाहिला असेल. मात्र सध्या सोशल मिडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल (Viral Video) होत आहे ज्यात स्वत: खेकडाच धुम्रपान करताना दिसत आहे. ऐकून विश्वास बसणार नाही पण हे खरे आहे. या व्हिडिओमध्ये एक खेकडा आपल्या पंजांनी तुटलेल्या सिगरेटचा तुकडा पकडलेला आहे आणि तो तोंडात ठेवून सिगरेटचा छान धूर उडवताना दिसत आहे. इतकच नव्हे तर हा खेकडा सिगरेटचे झुरके मारत छान लुटूपुटू चालत सुद्धा आहे. हा व्हिडिओ ट्विटरवर एकाने शेअर केला होता. त्यानंतर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला.
या व्हिडिओला ट्विटरवर 2020 मध्ये दिसलेली आणखी एक गोष्ट म्हणजे 'A Crab Smoke Cigarette' असे कॅप्शन दिले आहे. या व्हिडिओ पाहिल्यावर ट्विटर युजर्सला सिगरेटच्या पाकिटावरील खेकड्याची आठवण झाली. जो धुम्रपानाने कॅन्सर होतो असा सल्ला देतो.
हा व्हिडिओ जसा व्हायरल झाला तसा अनेकांना प्रश्न पडला की, खेकडा सिगरेट का ओढत असावा. तर अनेकांनी यावर मजेशीर मिम्स बनवले आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकजण हैराण झाले आहेत. एक खेकडा इतक्या चांगल्या पद्धतीने सिगरेट कशी काय ओढू शकतो हा प्रश्न सर्वांना बुचकळ्यात पाडणारा आहे.
यात अनेकांनी त्याची सिगरेटच्या पाकिटावर खेकड्याची आठवण करुन दिली. तर अनेकांनी खेकड्यावर सिगरेटचा पफ घेतला पाहिजे असे म्हटले आहे. तर अनेकांचे असे मत होते की जे लोक हा व्हिडिओ बनवत होते त्यांना खेकड्याला धुम्रपान करायला दिले पाहिजे नव्हते. तर काहींनी 2020 मध्ये काहीही होऊ शकते अशीही प्रतिक्रिया दिली आहे.