Valentine's Day 2022 Google Doodle: वेलेंटाईन डे च्या शुभेच्छा देण्यासाठी गूगलवर आज खास 3D Game Challenging डूडल!

तरूण प्रेमीयुगुलांना या दिवसाचं विशेष आकर्षण असतं

गूगल डूडल । PC: Google Homepage

आज 14 फेब्रुवारी अर्थात वेलेंटाईन डे (Valentine's Day)! कपल्स साठी खास असणार्‍या आजच्या दिवशी गूगलनेही प्रेमी युगुलांकरिता खास गूगल डूडल समर्पित केले आहे. फेब्रुवारी महिन्याची सुरूवात झाली की प्रेमी युगुलांच्य डोक्यात रोमांस, चॉकलेट्स, गिफ्ट्स यांचे विचार यायला सुरूवात होते. 14 फेब्रुवारीला वेलेंटाईन डे साजरा करण्यापूर्वी आठवडाभर सात वेगवेगळे रोमॅन्टिक डेज देखील साजरे केले जातात. आज गूगलच्या डूडलवर क्युटनेस आणि फन यांचा मिलाफ असलेले खास डूडल साकारण्यात आले आहेत. 3 डी अंदाजात असलेल्या डूडल मध्ये एक गेम आहे डूडलवर असणार्‍या लव्ह बर्ड्सना एकमेकांपर्यंत पोहचवण्याचं आव्हान आज देण्यात आलं आहे. Valentine’s Day 2022 Wishes: 'व्हेलेंटाईन डे’ निमित्त Wishes, Images, Whatsapp Status, Facebook Post, Greetings देत पार्टनरकडे आपल्या मनातील भावनांची द्या कबुली .

तुम्ही प्ले बटणावर क्लिक करून हा खेळ खेळू शकता. त्यानंतर, स्क्रीनवर एक चक्रव्यूह दिसेल. Google चा लोगो पूर्ण होईपर्यंत लीव्हर आणि स्विचच्या मदतीने तुम्हांला दोन हॅमस्टरला पुन्हा एकत्र येण्यास मदत करायची आहे. पूर्ण झालेला Google लोगो दोन हॅमस्टर्सना एकमेकांपर्यंत पोहोचण्यासाठी एक बोगदा म्हणून काम करणार आहे. हॅमस्टर पुन्हा एकत्र आल्यानंतर, स्क्रीनवर व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा असा संदेश घेऊन हार्ट दिसेल.

वेलेंटाईन डे हा वर्षभरातील बहुप्रतिक्षित दिवसांपैकी एक आहे. तरूण प्रेमीयुगुलांना या दिवसाचं विशेष आकर्षण असतं. जगभरात गेग्रेरियन कॅलेंडरनुसार 14 फेब्रुवारी दिवशी लोकं एकमेकांविषयी आपलं प्रेम व्यक्त करतात. त्यांना आवडीच्या गोष्टी गिफ्ट म्हणून देऊन रोमॅन्टिक अंदाजात आजचा दिवस सेलिब्रेट करतात. वेलेंटाईन डे सेलिब्रेशनची सुरूवात Lupercalia च्या रोमन सणातून झाली आणि 17 व्या शतकाच्या आसपास जगभरात त्याला लोकप्रियता मिळाली.