धक्कादायक! नाचत नाही म्हणून नौटंकीवाल्या तरुणीवर भर लग्नात गोळी झाडली; रुग्णालयात उपचार सुरु मात्र अवस्था गंभीर (Watch Video)
हा गोळी चालवणारा व्यक्ती गावच्या सरपंचाचा नातेवाईक असून त्याचे नाव फुल सिंह असल्याचे सांगण्यात आले आहे.
उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) अनेक लग्नांमध्ये बाहेरून नौटंकी वाल्या डान्सर्स (UP Nautanki Dance) बोलावून नाचवण्याचा प्रकार पाहायला मिळतो, मुळातच लग्नाच्या पवित्र सोहळ्याला ही हुल्लडबाजी करत गालबोट लावणे गैर आहे मात्र यात भर म्हणून कि काय एक आणखीनच धक्कादायक प्रकार युपीमधील टिकरी (Tikri) या गावात अलीकडे घडल्याचे समजत आहे. झालं असं की, लग्नात नाचायला आलेली एक डान्सर तरुणी हळूहळू नाचत असल्याने स्टेजखाली जमलेल्यांपैकी एकाने चक्क तिच्यावर गोळी झाडली. हा गोळी चालवणारा व्यक्ती गावच्या सरपंचाचा नातेवाईक असून त्याचे नाव फुल सिंह असल्याचे सांगण्यात आले आहे. हि गोळी तरुणीची तोंडावर लागली असून यांनतर तिला लखनऊ येथील रुग्णालयात नेण्यात आले, तिथे तिच्यावर सध्या उपचार सुरु आहेत मात्र अजूनही तिची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. या घटनेचा एक व्हिडीओ (Viral Vieo) सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून नेटकाऱ्यानी यावर संताप व्यक्त केला आहे.
व्हायरल व्हिडीओ मध्ये दिसत असल्याप्रमाणे, या तरुणीला काही जण नाचण्याची ऑर्डर देत आहेत असे न केल्यास गोळी चालवू असा इशाराही त्यांनी दिला होता, यावेळी तरुणीने हो, गोळी चालवा असे गंमतीत म्हंटले मात्र या नराधमांनी खरोखरच तिच्या चेहऱ्यावर गोळी झाडली. यानंतर तिच्या सोबत असणाऱ्या अन्य तरुणीने तिला धरून ठेवले. या घटनेत बराच वेळ या तरुणीच्या चेहऱ्यातून रक्त वाहून गेल्याने तिची शुद्ध सुद्धा हरपली होती.
व्हायरल व्हिडीओ
हा व्हिडीओ शिव अरुर नामक एका व्यक्तीने ट्विट केला आहे तर त्या व्हिडीओ सोबतच या मुलीचा सध्या घडीचा पोहोतो देखील त्याने जोडला आहे. यात आपण बघू शकता की तरुणीला जबर दुखापत झाली असून तिची अवस्था अद्याप सुधारलेली नाही. शाळेत असताना बनवला होता मित्राचा Sex Video; टीव्ही स्टारचा धक्कादायक खुलासा, वाचा सविस्तर
दरम्यान माहिती मिळताच नवऱ्या मुलाच्या मामाने पोलिसात तक्रार केली आणि मग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन फुल सिंह आणि त्याचा भाऊजी व सरपंच सुधीर सिंह याला अटक केल्याचे समजत आहे. या घटनेनंतर महिलांची आबा राखण्यापासून ते सुरक्षेपर्यंत सर्वच प्रश्न ऐरणीवर आल्याचे म्हंटले जात आहे.