US Presidential Election 2020 Funny Memes & Jokes: अमेरिका अध्यक्षीय निवडणूक 2020 च्या निकालाची उत्सुकता शिगेला; प्रतीक्षा करणाऱ्या नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया सोशल मीडियावर तुफान व्हायरल

3 नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या निवडणुकीची सलग दुसऱ्या दिवशी मतमोजणी सुरु आहे. त्यामुळे निकालाची वाट पाहुन कंटाळलेल्या नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर फनी मीम्स आणि जोक्स शेअर करायला सुरुवात केली आहे.

US Presidential Election 2020 Funny Memes (Photo Credits: @nyus_app/ @suvseetal/ Twitter)

अमेरिका अध्यक्षीय निवडणूक 2020 (US Presidential Election 2020) च्या निकालाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. महासत्ता अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी कोण विराजमान होणार याची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे. 3 नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या निवडणुकीची सलग दुसऱ्या दिवशी मतमोजणी सुरु आहे. त्यामुळे निकालाची वाट पाहुन कंटाळलेल्या नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर फनी मीम्स आणि जोक्स शेअर करायला सुरुवात केली आहे. नेहमीप्रमाणे हे मीम्स (Memes), जोक्स (Jokes) तुफान व्हायरल होत आहेत.

2016 च्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीत अधिक मतदान झाले यावरुन अमेरिकन नागरिकांचा निवडणुकीबद्दलचा उत्साह दिसून येतो. दरम्यान, मतदारांची संख्या वाढल्याने मतमोजणीला वेळ लागू शकतो. मात्र निकालाची प्रतिक्षा करणाऱ्या नेटकऱ्यांनी मीम्स आणि जोक्सच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. (अमेरिकेच्या कॉंग्रेसवुमन Pramila Jayapal यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूकीत Kamala Harris यांना मतदान करण्यासाठी आवाहन करताना 'पनीर टिक्का' म्हणून बनवलेल्या डिशवरून नेटकर्‍यांनी घेतली त्यांची शाळा; पहा मजेशीर मिम्स)

पहा फनी मीम्स आणि जोक्स:

दरम्यान, सध्याची आकडेवारी पाहता डेमोक्रॅटीक पक्षाचे उमेदवार जो बायडन आघाडीवर असून त्यांची ही तिसरी निवडणूक आहे. तर अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांना राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवत आहेत.