जानेवारी 2021पासून UPI Transaction महागणार असल्याचा दावा खोटा; PIB Fact Check ने केला खुलासा
NPCI च्या ट्वीटर अकाऊंटवर देखील माहिती देताना त्यांना यूपीआय च्या व्यवहारांमध्ये 1 जानेवारी पासून बदल होणार असून नव्या नियमांनुसार अधिक पैसे मोजावे लागू शकतात असे म्हटल्याचं वृत्त खोटं असल्याचं स्पष्ट करण्यात आले आहे.
भारतामध्ये सध्या कोरोना संकटकाळात अनेकजण ऑनलाईन किंवा डिजिटल पेमेंटचा वापर करत आहे. अशामध्ये आता मागील काही दिवसांपासून नवं वर्षात UPI द्वारे व्यवहार केल्यास अधिक पैसे मोजावे लागणार अशा आशयाच्या बातम्या फिरत होत्या. मात्र आता यावर खुलासा करताना PIB Fact Check कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार ही सारी वृत्त खोटं असल्याचं स्पष्ट करण्यात आले आहे. नेशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कडून देखील ट्वीटरच्या माध्यमातून त्याचा खुलासा करत 1 जानेवारी 2021 मध्ये थर्ड पार्टी अॅपवर अतिरिक्त पैसे मोजावे लागतील अशा दाव्याच्या बातम्यांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान मीडिया रिपोर्ट्सने वायरल झालेल्या वृत्तांमध्ये युपीआय द्वारा 20 पेक्षा जास्त व्यवहार केल्यास प्रत्येक व्यवहारावर अडीच ते 5 रूपये अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. सरकारने UPI सेवा निशुल्क ठेवली असली तरी बँकांनी मात्र, आता त्यावर शुल्क वसुली करण्याचा निर्णय घेतल्याचाही दावा करण्यात आला होता. तसेच थर्ड पार्टी अॅपवर मिळणारी सवलत रोखण्यासाठी हे शुल्क आकारले जाऊ शकते असेदेखील मुख्य कारण पुढे करण्यात आलं होतं मात्र ही सारी वृत्त खोटी असून नेशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कडून त्यांच्या पॉलिसीमध्ये अशाप्रकारे कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत असे देखील स्पष्ट केले आहे.
PIB Fact Check Tweet
NPCI च्या ट्वीटर अकाऊंटवर देखील माहिती देताना त्यांना यूपीआय च्या व्यवहारांमध्ये 1 जानेवारी पासून बदल होणार असून नव्या नियमांनुसार अधिक पैसे मोजावे लागू शकतात असे म्हटल्याचं वृत्त खोटं असल्याचं स्पष्ट करण्यात आले आहे. 5 नोव्हेंबर 2020 च्या आमच्या प्रेस रीलीजमध्ये कोणतेही बदल करण्यात आले नाहीत असे देखील त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान सध्या गूगल पे, पेटीएम, अमेझॉन पे अशी अनेक यूपीआय ट्रान्झॅक्शनसाठी पर्याय खुले आहेत. यापुढेही या अॅपवरील सेवा सुरळीत सुरू राहणार आहेत.