Unlock 1 Funny Memes And Jokes: अनलॉक 1 वर सोशल मीडियात भन्नाट मीम्सचा पाऊस!
देशातील कटेन्मेंट झोनमध्ये 30 जून पर्यंत लॉकडाऊन कायम राहणार असून Unlock 1अंतर्गत तीन टप्प्यात विविध सेवा-सुविधा सुरु करण्यात येणार आहेत. यावर सोशल मीडियात भन्नाट मीम्स व्हायरल होत आहेत.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशातील लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. देशातील कटेन्मेंट झोनमध्ये 30 जून पर्यंत लॉकडाऊन कायम राहणार असून Unlock 1 अंतर्गत तीन टप्प्यात विविध सेवा-सुविधा सुरु करण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात 8 जूनपासून हॉटेल्स, शॉपिंग मॉल्स, धार्मिक स्थळे सुरु करण्यात येणार आहेत. तर दुसऱ्या टप्प्यात शाळा-कॉलेजेस, शैक्षणिक संस्था सुरु करण्याचा विचार आहे. विशेष म्हणजे परिस्थितीचा आढावा घेऊन तिसऱ्या टप्प्यात रेल्वे, मेट्रो, विमानसेवा, बार, थिएटर्स यांसारख्या सेवा सुरु करण्यात येतील. दरम्यान कोरोना व्हायरसचा धोका टाळण्यासाठी 24 मार्च रोजी लॉकडाऊन घोषित करण्यात आला. त्यानंतर तब्बल 4 टप्प्यात लॉकडाऊनचा कालावधी वाढत राहीला. गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाऊनमध्ये असलेले देशभरातील नागरिक आता हैराण झाले आहेत. त्यामुळे लॉकडाऊन कधी उठणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. परंतु, पुन्हा एकदा लॉकडाऊनचा कालावधी वाढल्याने सोशल मीडियावर मजेशीर मीम्स व्हायरल होत आहेत.
यापूर्वी लॉकडाऊनचा कालावधी वाढल्यानंतर प्रत्येक वेळी सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी मीम्सच्या माध्यमातून हास्याची जत्रा फुलवली. आताही सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी लॉकडाऊन 5.0 आणि अनलॉक 1 बद्दलचे बरेच मीम्स, जोक्स व्हायरल करायला सुरुवात केली आहे. (Unlock 1: तीसऱ्या टप्प्यातील आंतरराष्ट्रीय उड्डाणे, मेट्रो रेल, सिनेमा हॉल, जिम, जलतरण तलाव सुरू करण्यासंदर्भात सरकार निर्णय घेणार)
सोशल मीडियावर व्हायरल होणारे अनलॉक 1 फनी मीम्स:
देशाभरातील कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसागणित मोठी भर पडत आहे. त्यामुळे कोरोनामुळे उद्भवलेली गंभीर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. दरम्यान देशाभरातील कंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊन 5 घोषित करण्यात आला असून अनलॉक 1 च्या गाईडलाईन्स जारी करुन सरकारने देशातील जनतेला दिलासा दिला आहे.