Viral Video: रायगड पालीमध्ये एका दुकानात माजी सैनिक आणि तरुणाची एकमेकांना बेभान मारहाण,बिर्याणीचा वजन का कमी या वरुन झाला होता वाद,व्हिडिओ व्हायरल
राज्यात आता लोकांमध्ये छोट्या-छोट्या गोष्टींवरून वाद होतात. आज काल सोशल मीडिया वर आपल्याला अनेक छोट्या छोट्या गोष्टी वरुण लोक एक मेकांना मारहाण करतानाचे व्हिडीओ पाहायला मिळतात.असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Viral Video: राज्यात आता लोकांमध्ये छोट्या-छोट्या गोष्टींवरून वाद होतात. आज काल सोशल मीडिया वर आपल्याला अनेक छोट्या छोट्या गोष्टी वरुण लोक एक मेकांना मारहाण करतानाचे व्हिडीओ पाहायला मिळतात.असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये बिर्याणीच्या वजनावरून दोन लोकांमध्ये भांडण झाले. ही घटना पाली, रायगड, महाराष्ट्रातील असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एक व्यक्ती आपल्या मुलांसोबत बिर्याणी घेण्यासाठी एका दुकानात गेला होता, सुरुवातीला माजी सैनिक आणि हॉटेल मालकामध्ये बिर्याणीच्या वजनावरून वाद झाला. काही वेळाने वाद शांत देखील झाला. पण तेवड्यातच दुसरा तरुण तेथे आला आणि त्याने त्या व्यक्तीला बेदम मारहाण केली. या मारामारीत व्यक्ती जखमी होऊन खाली पडताना आपल्याला व्हिडीओ मध्ये दिसत आहे.हेही वाचा : Delhi Metro Fight Video: दोघांमध्ये जोरदार भांडण, एकाने दुसऱ्याला केली जबर मारहाण , दिल्ली मेट्रो ट्रेनचा व्हिडिओ व्हायरल
#wach l रायगड पालीमध्ये एका दुकानात माजी सैनिक आणि तरुणाची एकमेकांना बेभान मारहाण. बिर्याणीचा वजन का कमी या वरुन झाला होता वाद ...@ThaneKalyanDAB @RaigadPolice @navimumbaicv #raigad #pali #maharashtra pic.twitter.com/DA9HKLTtCI
— yuvraj surle (@SurleYuvraj) July 31, 2024
त्याच्या डोक्याला मार लागल्याने तो खाली पडला आणि बेशुद्ध झाला, त्यानंतर एक व्यक्ती येऊन त्याला मारहाण करणाऱ्या व्यक्तीला घेऊन गेला. व यानंतर जखमी होऊन पडलेल्या व्यक्तीचा मुलगा आणि मुलगी तिथे पोहोचतात आणि वडिलांना या अवस्थेत पाहून रडू लागले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जखमी व्यक्तीवर उपचार सुरू आहेत.
यासोबतच या व्यक्तीला मारहाण करणाऱ्या तरुणाविरुद्धही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा व्हिडिओ ट्विटरवर @SurleYuvraj या हँडलवर शेअर करण्यात आला आहे.
(The above story first appeared on LatestLY on Aug 01, 2024 06:55 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

