बापरे! भरदिवसा चक्क घरात घुसला वाघ; विश्वास न ठेवता येण्यासारखी घटना कॅमेऱ्यात कैद (Watch Viral Video)
हा व्हिडीओ नेमका कुठला आहे याबबाबत अजून स्पष्ट माहिती नाही पण हा व्हिडीओ भारतीय वन सेवा धिकारी सुशांत नंदा (Sushant Nanda) यांनी शेअर केला आहे
Tiger Enters In Home: कोरोना व्हायरस (Coronavirus) लॉकडाउन (Lockdown) काळात वन्य जीवांची मात्र चांगलीच मजा झाली असून त्यांना आता मुक्तपणे जंगलातच नव्हे तर रस्त्यांवर सुद्धा फिरता येत आहे. याआधीही काही वेळा आपण अनेक प्राणी रस्त्यावर टेहाळत असतानाचे व्हिडीओज फोटो सोहंसला मीडियावर पहिले आहेत, आता हे प्राणी म्हणजे मोर, एखादा दुर्मिळ पक्षी वैगरे इथपर्यंत मर्यादित असतील तर ठीक पण एखादा वाघ कोणाच्या समोर येऊन ठाकला तर...अशीच एक घटना आता सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओ (Viral Video) मध्ये पाहायला मिळत आहे. यामध्ये चक्क एक वाघ (Tiger) वस्तीतील घरात शिरला आहे असे दिसत आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे याबबाबत अजून स्पष्ट माहिती नाही पण हा व्हिडीओ भारतीय वन सेवा धिकारी सुशांत नंदा (Sushant Nanda) यांनी शेअर केला आहे,साधारण मध्य भारतातातील हा व्हिडीओ असण्याची शक्यता आहे.
या व्हिडीओ मध्ये तुम्ही पाहू शकता की, एक वाघ गावाकडील एका वस्तीत शिरलेला दिसत आहे. हा वाघ एका घरातून दुसऱ्या घरात शिरताना पाहायला मिळतोय, खरतर वाघाला पाहून गावकरी घाबरतात आणि आरडाओरडा करू लागतात त्यामुळे वाघ देखील गोंधळून सैरभैर धावू लागतो आणि त्यातच तो घरात शिरतो असे दिसत आहे. ठाणे शहरातील रस्त्यांवर फिरतोय Leopard? जाणून घ्या 'या' Viral Video मागील सत्य
पहा व्हायरल व्हिडीओ ट्विट
दरम्यान, आईएफएस सुशांत नंदा यांनी व्हिडीओ शेअर करताना याआधी सुद्धा आपण गुजरात मधील मानवी वस्तीत वाघ शिरलेला पाहिला होता आता पुन्हा एकदा असाच व्हिडीओ समोर येत आहे. हा व्हिडीओ मध्य भारतातातील असण्याची शक्यता आहे असे म्हंटले आहे. काही युजर्सने मात्र हा व्हिडीओ जुना असल्याचे म्हंटले आहे.