Hydrabad: रिल्स शुट करण्यासाठी भररस्त्यात उधळले नोटांचे बंड्डल, प्रसिध्द होण्यासाठी लोकांच्या जीवाशी खेळ (Watch Video)

कोणत्याही टोकाला जाऊन व्हिडिओ शूट करतात. अशीच एक घटना हैद्राबादच्या कुकटपल्ली भागात घडली आहे. भररस्त्यात एका तरुणाने पैशे उडवत नागरिकांचे लक्ष्य वेधले आहे.

Hydrabad Reel (Photo Credit INSTA)

Hydrabad:  सोशल मीडियावर प्रसिध्द होण्यासाठी तरुण काहीही करतात. कोणत्याही टोकाला जाऊन व्हिडिओ शूट करतात. अशीच एक घटना हैद्राबादच्या कुकटपल्ली भागात घडली आहे. भररस्त्यात एका तरुणाने पैशे उडवत नागरिकांचे लक्ष्य वेधले आहे. अश्या परिस्थितीत एका तरुणाने नागरिकांच्या जीवाशी खेळ केल्याचा व्हिडिओत दिसत आहे. (हेही वाचा- दिल्ली विमानतळावर प्रवाशाला हृदयविकाराचा झटका, CISF जवानाने CPR देऊन वाचवले प्राण, व्हिडिओ व्हायरल)

मिळालेल्या माहितीनुसार, इन्स्टाग्रामच्या एका वापरकर्त्यांने सोशल मीडियावर प्रसिध्द होण्यासाठी भररस्त्यात नोटांचा बंडल उडवला आहे. हे पाहून रस्त्यावरून प्रवाश करणाऱ्यांनी लगेच पैशे उचलण्यासाठी धाव घेतला. या घटनेमुळे कोणताही अपघात झाला असता असा नेटकऱ्यांनी सांगितले. हा व्हिडिओ पाहून नेटकरी संतापले आहे. रिल्स शूट करण्यासाठी तरुणांनी हे केल्याचे समजत आहे.

पैसे उधळतानाचा व्हिडिओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Itsme💥 (@its_me_power___)

पैसे उधळल्याचे पाहून अनेकांनी वाहन थांबवून पैशे गोळा करण्यासाठी रस्त्यावर गर्दी केली. यामुळे वाहतुक कोंडी देखील झाली. व्हिडिओला अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्यांनी हा व्हिडिओच्या कंमेट सेक्शनमध्ये पोलिसांना टॅग केले आहे. पोलिसांनी अश्या इन्फ्सुझरवर बंदी घालावी अशी विनंती केली आहे. कृपया कठोर कारवाई करा अशी मागणी नेटकऱ्यांनी केली.