चोरांसाठी खुशखबर! 'येथे' मिळत आहे तुम्हाला नोकरी
'या' ठिकाणी चक्क चोरांनी चोरी केली तरी त्यांना शिक्षा नाही तर नोकरी मिळत आहे.
जगात अशी कोणती वाईट गोष्ट नाही जी केल्यावर तुम्हाला शिक्षा मिळत नाही. असे होणे शक्यच नाही. मात्र 'या' ठिकाणी चक्क चोरांनी चोरी केली तरी त्यांना शिक्षा नाही तर नोकरी मिळत आहे.
इंग्लंडमधील एका कपड्याच्या दुकानात चक्क चोरांसाठी नोकरी देण्यात येत असल्याची जाहिरात झळकत आहे. तसेच जो चोर चोरी करण्यात उत्तम कुशल असेल अशाच व्यक्तींना येथे भरपगारी नोकरी देण्याचे दुकान मालकीणीने ठरविले आहे. मात्र मालकीणीने नोकरी करणाऱ्या चोरांना एक गळ घातली आहे. त्यामध्ये चोरांनी दुकानातील गोष्टी चोरायच्या आहेत अशी ही विचित्र गळ आहे. तर विविध प्रकारचे चोरी करण्याचे कौशल्य चोरांकडे असल्याने ही अट घालण्यात आली असल्याचे दुकानाच्या मालकीणीने सांगितले आहे. तसेच चोरी करताना त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटिव्ही सुद्धा लावण्यात आले आहेत.
तर चोरी करण्यासाठी प्रत्येक तासासाठी 64 डॉलर म्हणजेच 4500 रुपये मिळण्याची खुशखबर चोरांसाठी आहे. या नोकरीसाठी 'बार्क डॉट कॉम' या संकेतस्थळावर सर्व माहिती आणि नोकरीची संधी उपलब्ध करुन दिली आहे.