Scary Dance Viral Video: महिलेने गाण्यावर केला थरारक डान्स; व्हिडिओ पाहून नेटकरी झाले लोटपोट; Watch

हा व्हिडिओ 'official_viralclips' वापरकर्त्याने इंस्टाग्रामवर पोस्ट केला असून त्याला एका दिवसात 461 लाईक्स मिळाले आहेत.

Scary Dance Viral Video: महिलेने गाण्यावर केला थरारक डान्स; व्हिडिओ पाहून नेटकरी झाले लोटपोट; Watch
Scary Dance Viral Video (Photo Credits: Instagram)

Scary Dance Viral Video: सोशल मीडियावर एक मजेदार व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर नेटिझन्सला हसू आवरणं कठीण आहे. व्हिडिओ सुरू होताच, हिरवी साडी नेसलेली एक महिला खोलीच्या मध्यभागी उभी राहून गाताना दिसत आहे. कार्यक्रमातील सहभागी खोलीभोवती जमिनीवर बसलेले दिसतात आणि संगीतकारांचा समूह तबला, हार्मोनियमसह इतर भारतीय वादन वाजवताना दिसतो.

अचानक या स्त्रीच्या शरीरात काहीतरी प्रवेश करते (लोकांना भीती दाखवण्यासाठी) आणि तिला नाचण्याची इच्छा होते. पण हे सामान्य नृत्य नाही. तुम्ही तुमच्या आयुष्यात अशा डान्स स्टेप्स क्वचितचं पाहिल्या असतील. ही महिला मायक्रोफोन खाली न ठेवता, ती वर्तुळाच्या एका काठावर उडी मारून सरकते. त्यानंतर ती सुपर स्पीड आणि स्मूथ किक-स्लाईडने दुसऱ्या बाजूला सरकते. शेवटी, ती तशीच मागे बसलेल्या प्रेक्षकांकडे सरकते आणि ठुमका स्टेप करते. (हेही वाचा - IPL 2022: आईपीएल सामन्यादरम्यान चुंबन घेतलेल्या जोडप्याचा फोटो व्हायरल; नेटीझन्सनी शेअर केले मजेदार मीम्स)

हा व्हिडिओ 'official_viralclips' वापरकर्त्याने इंस्टाग्रामवर पोस्ट केला असून त्याला एका दिवसात 461 लाईक्स मिळाले आहेत. हा व्हिडिओ पाहून नेटिझन्स हसून हसून लोटपोट झाले आहेत.

(The above story first appeared on LatestLY on Apr 03, 2022 02:34 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).