Snake Bite Video: सापाने घेतला तरुणाच्या जीभेला चावा; व्हिडिओ पाहून बसेल तुम्हाला धक्का, Watch Viral Video

हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. तर, सुमारे पाच लाख लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे.

Snake Bite Video: सोशल मीडियावर (Social Media) कधी आणि काय बघायला मिळतं, काही सांगता येत नाही? अनेकवेळा अशी दृश्ये बघायला मिळतात, जी पाहून लोकांच्या भावना विचलित होतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे. ज्यात एक व्यक्ती सापाशी (Snake) मस्ती करताना दिसत आहे. परंतु, सापाने त्या व्यक्तीला धोकादायक पद्धतीने चावा घेतला. त्यानंतर त्या व्यक्तीची अवस्था पाहून लोक थक्क झाले. आता हा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत.

जगात असे अनेक लोक आहेत, ज्यांना सापाबरोबर मस्ती करायला आवडतं. काहींना हा छंद आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये (Snake Attack Video) एक व्यक्ती सापासोबत मस्ती करताना दिसत आहे. ही व्यक्ती सापाला हातात धरून तोंडाजवळ आणत आहे. साप तोंडाजवळ येताच ती व्यक्ती जीभ बाहेर काढते. सापाला संधी मिळताच तो धोकादायक पद्धतीने त्या व्यक्तीला चावतो. जे पाहून तिथे उपस्थित लोकही थक्क झाले. (हेही वाचा -एका व्यक्तीने Cobra वर केला गोळीबार, चिडलेल्या कोब्राने पुढे जे केले ते पाहून बसेल धक्का, पाहा व्हिडीओ)

हा धोकादायक व्हिडिओ पाहून तुमच्याही हृदयाचा ठोका चुकला असेल. ज्याने हे दृश्य पाहिले, तो पाहतचं राहिला. आता हा प्रकरण सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर 'im_bazigar_03' नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. तर, सुमारे पाच लाख लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by /(_-_Arav__-/( (@im_bazigar_03)

दरम्यान, या व्हिडिओवर अनेक जण आश्चर्य व्यक्त करत आहेत. त्यामुळे काही लोक याला जीवघेणे म्हणत आहेत. तर काहींचे म्हणणे आहे की हे पुढे मृत्यूला आमंत्रण आहे.