Viral: जेवण चवदार होते, मी ते खाल्ले, डिलिव्हरी बॉयच्या मेसेजवर ग्राहकाला राग अनावर, वाचा नेमकं प्रकरण
तर तुमची पहिली प्रतिक्रिया काय असेल? साहजिकच तुमचा राग येईल.
कल्पना करा की तुम्ही तुमच्या आवडत्या खाद्यपदार्थाची ऑर्डर फूड डिलिव्हरी (Food Delivery App) अॅपवरून केली आहे. तुम्हाला खूप भूक लागली आहे आणि तुम्ही अन्न येण्याची वाट पाहत आहात. पण तेवढ्यात डिलिव्हरी बॉयकडून (Delivery Boy) मेसेज येतो की तो जेवण देऊ शकणार नाही, कारण त्याने वाटेतच तुमचे स्वादिष्ट अन्न खाल्ले आहे. तर तुमची पहिली प्रतिक्रिया काय असेल? साहजिकच तुमचा राग येईल. असाच काहीसा प्रकार यापूर्वी एका ग्राहकासोबत घडला होता. त्याने डिलिव्हरी बॉयसोबतच्या संभाषणाचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केला आहे , जो वाचून सगळेच थक्क झाले आहेत. डिलिव्हरी बॉयने ग्राहकाला पाठवलेल्या मेसेजचा स्क्रीनशॉट पाहून सगळेच थक्क झाले आहेत.
ही बाब ब्रिटनची आहे. लियाम बॅगनॉल नावाच्या व्यक्तीने ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी Deliveroo मार्फत जेवण ऑर्डर केले होते. पण डिलिव्हरी एजंटने त्याचे अन्न मध्यंतरी खाल्ले. व्हायरल चॅटमध्ये डिलिव्हरी बॉयने प्रथम लिहिले - सॉरी. यावर ग्राहकाने विचारले - काय झाले? प्रत्युत्तरात, डिलिव्हरी एजंटने लिहिले - जेवण चवदार होते, म्हणून मी ते खाल्ले. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही कंपनीकडे याबाबत तक्रार करू शकता.
डिलीवरी कर्मचाऱ्याचे उत्तर वाचून ग्राहकाला संताप आला. पण डिलिव्हरी एजंटने दिलेले उत्तर वाचून ग्राहक आणखीनच चक्रावून गेले. लियाम बॅगनॉलच्या ट्विटला आतापर्यंत 1 लाख 91 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे, तर सुमारे 14 हजार लोकांनी रिट्विट केले आहे. हेही वाचा Indian Railways च्या नवाने सबसिडी किंवा बक्षिस देण्याचं आमिष दाखवणार्या बनावट वेबसाईट पासून सावधान; रेल्वे मंत्रालयाचं प्रवाशांना आवाहन
द सनच्या वृत्तानुसार, फूड डिलिव्हरी अॅप कंपनीनेही प्रतिक्रिया दिली आहे आणि हे प्रकरण समोर आणल्याबद्दल आभार मानले आहेत. यासोबतच एका नंबरवर मेसेज करून संपूर्ण प्रकरणाची माहिती देण्यास सांगितले आहे. याशिवाय कंपनीने ग्राहकांची माफीही मागितली आहे.