Cashew Shaped Egg: काजूच्या आकाराचे अंडे देणारी कोंबडी बनली सेलिब्रिटी; सेल्फी घेण्यासाठी लोक करत आहेत गर्दी, Watch Video
त्याच्या फार्ममध्ये अनेक कोंबड्या आहेत. परंतु, त्यापैकी एक काळी कोंबडी खूप खास आहे. कारण, ही कोंबडी काजूच्या आकाराची अंडी घालते.
Cashew Shaped Egg: आत्तापर्यंत आपण सर्वांनी लंब गोलाकार आकाराची अंडी पाहिली असतील. परंतु, तुम्ही कधी काजूच्या आकाराचे अंडे (Cashew Shaped Egg) पाहिले आहे का? नसेल तर हा व्हिडिओ नक्की पहा. कारण, व्हिडिओमधील कोंबडी काजूच्या आकाराची अंडी देऊन सेलिब्रिटी बनली आहे. कर्नाटकातील लैला गावातील ही कोंबडी सध्या चर्चेत असून तिच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी दूरदूरवरून लोक येत आहेत.
कर्नाटकातील लैला गावात राहणाऱ्या प्रशांतने काही दिवसांपूर्वीच कुक्कुटपालन सुरू केले. त्याच्या फार्ममध्ये अनेक कोंबड्या आहेत. परंतु, त्यापैकी एक काळी कोंबडी खूप खास आहे. कारण, ही कोंबडी काजूच्या आकाराची अंडी घालते. या आकाराची अंडी पाहून प्रशांतलाही आश्चर्य वाटले. सुरुवातीला त्याला विश्वास बसला नाही. एक-दोन वेळा त्याला वाटलं एखाद्यावेळी असं झालं असावं. मात्र, त्यानंतरही ही कोंबडी काजूच्या आकाराची अंडी घालू लागली. त्यानंतर प्रशांतने यासंदर्भात पशुवैद्याशी चर्चा केली. (हेही वाचा - Viral Video: नदीत दगडावर आरामात बसलेला असताना अचानक महाकाय साप पाहून तरूणाची उडाली भंबेरी, पाहा काय केले तरुणाने)
कोंबडीची तपासणी केल्यानंतर पशुवैद्यकाने सांगितले की, कोंबडीच्या ग्रंथीमध्ये समस्या आहे किंवा तिच्या पुनरुत्पादक अवयवांमध्ये कृमी आहेत. ज्यामुळे अंड्यांचा आकार सामान्य नाही. ही बातमी गावात पसरताच लोक काजूच्या आकाराची अंडी आणि कोंबडी पाहण्यासाठी शेतात पोहोचू लागले. या कोंबडीला पाहण्यासाठी लोक जमले. आता ही कोंबडी सेलिब्रिटी झाली आहे. लोक त्याच्यासोबत सेल्फी घेत आहेत. या कोंबडीचे आणि भन्नाट अंड्याचे फोटो आणि व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.