सुरत: मुलांच्या लग्नाआधी पळून गेलेले वरपिता आणि वधूमाता घरी परतले; पोलिसात नेताच पुन्हा केले पलायन
सुरत (Surat) मधील एका लग्नाआधी नवऱ्या मुलाचे बाबा आणि नवऱ्या मुलीची आई या दोन पूर्व प्रेमींनी पळून जाण्याचा निर्णय घेतला होता, आताच्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी हे जोडपं पुन्हा आपल्या घरी परतले होते पण त्यानंतर एक महिना होतो ना होतो तो वर हे दोघे पुन्हा आपआपल्या घरातून पळून गेले आहेत
सुरत (Surat) मधील एका लग्नाआधी नवऱ्या मुलाचे बाबा आणि नवऱ्या मुलीची आई या दोन पूर्व प्रेमींनी पळून जाण्याचा निर्णय घेतला होता, आताच्या माहितीनुसार, एका महिन्यापुर्वी हे जोडपं आपल्या घरी परतले होते पण त्यानंतर आता हे दोघे पुन्हा आपआपल्या घरातून पळून गेले आहेत. या पुरुषाचे नाव हिंमत पांडे (वय 46 वर्ष) आणि महिलेचे नाव शोभना रावल (वय 43 वर्षे) असे आहे. 10 जानेवारी रोजी हे दोघेही आपल्या मुलांच्या लग्नाआधी पळून गेले होते, त्यानंतर काही दिवसात ते पुन्हा आपआपल्या घरी परतले मात्र यावेळी शोभना यांच्या पती ने त्यांना स्वीकारण्यास नकार दिला परिणामी त्या स्वतःच्या माहेरी निघून आल्या त्यावेळी शोभना यांच्या वडिलांनी सुद्धा त्यांना घरात घेण्याऐवजी पोलीस स्टेशनला नेले. यानंतर हिंमत आणि शोभना यांनी पुन्हा एकदा आपआपले घर सोडुन पळुन जाण्याचा निर्णय घेतला.
प्राप्त माहितीनुसार, यावेळेस हे दोघे बेपत्ता झाल्यावर कुणाच्याही घरच्यांनी पोलिसात तक्रार नोंदवली नाहीये, हे जोडपं आता सुरत मध्येच काय ठिकाणी भाड्याच्या घरात राहत असल्याचे दोन्ही कुटुंबांनी सांगितले आहे. नवऱ्याचे बाबा आणि नवरीच्या आईचं सूत जुळलं; आईवडील पळून गेल्याने मुलांचं लग्न मोडलं, वाचा सविस्तर
दरम्यान, पळून गेलेलं जोडपं म्हणजेच मुलाचे बाब आणि मुलीची आई हे लहानपणापासून एकमेकांना ओळखत होते, या आधी त्यांचे प्रेमप्रकरण सुद्धा होते मात्र काही कारणास्तव या दोघांचे एकमेकांशी लग्न होऊ शकले नाही. कालांतराने या दोघांच्या मुलांचे देखील प्रेमसंबंध जुळून आले, याच निमित्ताने या दोघांची सुद्धा पुन्हा ओळख झाली पण यावेळेस व्याही म्ह्णून ते एकमेकांच्या समोर आले होते. जुने प्रेमी पुन्हा समोर आल्यावर त्यांच्यातील बोलणे वाढून पुन्हा त्यांचे प्रेम जिवंत झाले आणि परिणामी मुलांच्या लग्नसमारंभाच्या अगदी दोन आठवड्यांच्या आधीच त्यांनी एकमेकांसोबत पळून जाण्याचा निर्णय घेतला. आईवडिलच पळून गेल्याने दोन्ही कुटुंबांनी मिळून मुलांचे लग्न मात्र मोडून टाकण्याचा निर्णय घेतला होता.