Summer Season Google Doodle: यंदाच्या ग्रीष्म ऋतूच्या स्वागतासाठी गूगलने साकारलं कलरफूल डुडल!
गूगल डुडलवर हॉट एअर बलून आणि खुदकन हसणारा सूर्य नारायण देखील दाखवत हलक्या नारंगी रंगामध्ये प्रसन्न गूगल डुडल युजर्ससाठी खुलं केलं आहे.
गुगल या जगातील आघाडीच्या सर्च इंजिन होमपेज वर आज (20 जून) Summer Season Google Doodle च्या माध्यमातून ग्रीष्म ऋतूचं स्वागत करण्यात आलं आहे. दरम्यान आजपासून उत्तर गोलार्धामध्ये (Northern Hemisphere) उष्णता वाढायला सुरूवात होते. 21 जून हा वर्षातला सर्वात मोठा दिवस असतो. त्यामुळे गूगलने हे निमित्त साधत आपल्या डुडलच्या माध्यमातून या नव्या ऋतूच्या युजर्सना रंगबेरंगी शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने गूगल डुडलवर हॉट एअर बलून आणि खुदकन हसणारा सूर्य नारायण देखील दाखवत हलक्या नारंगी रंगामध्ये प्रसन्न गूगल डुडल युजर्ससाठी खुलं केलं आहे.
आजपासून दक्षिणायनाला देखील सुरूवात होते. वातावरणात बदल होण्यास सुरूवात होते. आता हळूहळू उत्तर गोलार्धामध्ये दिवस मोठा आणि रात्र लहान होत जाते. हा काळ 21 जून ते 22 सप्टेंबरचा असतो. Spring Season 2020: 'वसंत ऋतु' 2020 आगमनाच्या निमित्त Google ने साकारलं कलरफूल डुडल!
20 जूनच्या रात्रीपासून पृथ्वी अक्षवृत्त साडे तेवीस डिग्रीच्या झुकावाने 11 हजार किमी प्रती तासाच्या वेगाने पश्चिम दिशेकडून पूर्वेला फिरते. सोबत पृथ्वी आपल्या कक्षेतून एक लाख पाच हजार किमी तासाच्या वेगाने सुमारे 89 कोटी 40 लाख किमी लंब वर्तुळाकार कक्षेत सूर्याची परिक्रमा करते. त्यामुळे 21 जून हा वर्षभरातला सर्वात मोठा दिवस ठरतो. त्यामुळे दरवर्षी 21 जून हा दिवस लवकर उगवतो आणि रात्री उशिरा संपतो.
दरम्यान गूगल अनेक महत्त्वाच्या घटना, थोरामोठ्यांचे वाढदिवस, समाजातील घटना यांना मानावंदना देण्यासाठी, त्याच महत्त्व अधोरेखित करण्यासाठी गूगल डूडलच्या माध्यमातून आपली वेगळी गुगल डुडल दरवर्षी साकारत असतात.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)