परीक्षा रद्द झाल्याने 'जय कोरोना' म्हणत विद्यार्थ्यांचे सेलिब्रेशन; पहा VIral Video

पहा व्हायरल व्हिडिओ..

Students Celebration on Cancellation of Exam | (Photo Credits: Twitter)

कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. तर देशातही कोरोनाची दहशत अधिक गडद होत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सरकारने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. 31 मार्चपर्यंत शाळा, महाविद्यालये आणि इतर शिक्षण संस्थांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. एकीकडे देशावर कोरोनाच्या भीतीचे सावट असताना अचानक मिळालेल्या सुट्टीचा आनंद विद्यार्थ्यांनी चक्क नाचून सेलिब्रेट केला आहे. दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या सेलिब्रेशनचा हा व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होत आहे. यात आनंदाच्या भरात विद्यार्थी 'जय कोरोना, जय कोरोना' अशा घोषणा देत असल्याचे पाहायला मिळत आहे. 'असा कसा रोग कोरोना' यासारख्या कोरोना व्हायरस वरील मजेशीर मराठी गाण्यांची सोशल मीडियात धूम (Watch Video)

आयआयटी दिल्लीचे संचालक व्ही. रामगोपाल राव यांनी परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती ट्विट करुन दिली होती. या ट्विटखाली आयआयटीमध्ये शिकणाऱ्या रक्षा अग्रवाल हिने विद्यार्थ्यांच्या सेलिब्रेशचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. 'मौत से डर नही लगता एक्झाम से लगता है…' असे कॅप्शन तिने या व्हिडिओला दिले आहे.

पहा व्हायरल व्हिडिओ:

दिल्लीच्या आयआयटीमधील काराकोरम वस्तीगृहामधील विद्यार्थ्यांचा हा व्हिडिओ असून यात कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सुट्टी मिळाल्यामुळे झालेला आनंद विद्यार्थी साजरा करताना दिसत आहेत.

Corona Virus : कोरोना वायरसमुळे 'या' क्षेत्रातील नोकऱ्या धोक्यात? Watch Video

कोरोनाच्या दहशतीमुळे आयआयटी दिल्लीने परीक्षा, कार्यक्रम 31 मार्चपर्यंत रद्द केले आहेत.