IPL Auction 2025 Live

Ganesh Chaturthi 2023: ओडिसातील कटकमध्ये गणेश मूर्ती मिरवणुकीला गालबोट, विजेचा धक्का लागून विद्यार्थ्याचा मृत्यू, 4 जण जखमी, Watch Video

जखमींना गंभीर अवस्थेत उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गणेश मूर्तीवरील ध्वज 11 केव्ही वायरच्या संपर्कात आला ज्यामुळे वाहनात करंन्ट आला.

Student electrocuted during Ganesh idol procession (PC - ANI)

Ganesh Chaturthi 2023: गणेश मूर्ती मिरवणुकीदरम्यान (Ganesh Idol Procession), एका खाजगी विद्यापीठातील विद्यार्थ्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तसेच इतर चार जण गंभीर जखमी झाले आहे. मंगळवारी कटक शहरातील नाराज भागात गणेश मूर्ती घेऊन जात असलेल्या ट्रॅक्टरचा 11 केव्ही विद्युत तारेशी संपर्क आला.

खासगी विद्यापीठातील विद्यार्थी गणेशमूर्ती आपल्या संस्थेत घेऊन जात असताना ही घटना घडली. जखमींना गंभीर अवस्थेत उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गणेश मूर्तीवरील ध्वज 11 केव्ही वायरच्या संपर्कात आला ज्यामुळे वाहनात करंन्ट आला. मूर्तीसह ट्रॅक्टरवर बसलेल्या विद्यार्थ्यांना विजेचा धक्का बसला आणि त्यातील एकाचा जागीच मृत्यू झाला तर इतर चार जण गंभीर जखमी झाले. (हेही वाचा -Ban On Hookah Bars: कर्नाटक सरकारचा हुक्का बारवर बंदी घालण्याचा आणि धूम्रपानासाठी वय वाढवण्याचा विचार)

दुसर्‍या एका घटनेत भुवनेश्वरमधील शहीद नगर येथील शांतीपल्ली भागातील एका युवकाचा राज्याच्या राजधानीच्या बाहेरील कुआखाई नदीत भगवान विश्वकर्माच्या मूर्तीचे विसर्जन करताना बुडून मृत्यू झाला.