Spring Season 2020: 'वसंत ऋतु' 2020 आगमनाच्या निमित्त Google ने साकारलं कलरफूल डुडल!
निसर्गातील याच बदलाचं स्वागत गूगल या सर्च इंजिनने देखील खास डूडलच्या माध्यमातून केलं आहे.
Spring Season 2020 Google Doodle: भारतामध्ये सहा ऋतूंचा राजा म्हणून ओळखल्या जाणार्या वसंत ऋतूची (Spring Season) आजपासून सुरूवात होत आहे. पानगळ ओसरून निसर्गामध्ये नव पालवी फूटायला सुरूवात होते. जगभरात वसंत ऋतूचं आगमन वेगवेगळ्या दिवशी होते. मात्र अंदाजे 21 मार्च ते 21 जून या काळात उत्तर गोलार्धात Spring म्हणजेच वसंत असतो. निसर्गातील याच बदलाचं स्वागत गूगल या सर्च इंजिनने देखील खास डूडलच्या माध्यमातून केलं आहे. दरम्यान आज गूग़लच्या होम पेज वर निळ्याशार आभाळात पानांची दाटी असं मोहक वसंत ऋतू च्या आगमनानिमित्त गूगल डुडल बनवण्यात आले आहे.
वसंत ऋतूचं आगमन होताच वातावरणामध्ये बदल होतात. हळूहळू उष्णता वाढायला सुरूवात होते. महाराष्ट्रात वसंतोत्सवाची चाहूल होळी या सणाने होते. तर पुढे हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र महिन्यात नववर्षाची देखील सुरूवात होते. 21 मार्च हा 'विषुवदिन' असून वसंत ऋतूचे आगमनाची चाहूल देते. तसेच या दिवशी दिवस आणि रात्र समान म्हणजे 12 तासांचे असतात. कारण या दिवशी सूर्य विषुववृत्तातून जातो.
वसंत ऋतूच्या आगमनाने पुन्हा निसर्गात हिरवळ दिसायला सुरूवात होते. मार्च महिन्याच्या मध्यापासूनच अनेक झाडांना पालवी फूटायला सुरूवात होते. त्यामुळे सर्वत्र आनंदाचं, चैतन्याचं वातावरण असतं. मग या नव्या सुरूवातीचे तुम्ही देखील साक्षीदार व्हा आणि पुन्हा नव्या जोमाने कामाला लागा. कदाचित हाच संदेश घेऊन आजचे गूगल डूडल साकरण्यात आले आहे. गूगल जगभरातील महत्त्वाच्या व्यक्तींचे स्मृतिदिन, सण साजरे करण्यासाठी आकर्षक गूगल डूडल साकारून हा आनंद सेलिब्रेट करतो.