साउथ वेस्ट एअरलाईन्सचा महिलेवर मुजोरपणा; Boobs अश्लील आणि आक्षेपार्ह दिसत असल्याचे कारण देत घालायला लावले पायलटचे टी-शर्ट, ट्विटरवर संताप व्यक्त

या महिलेचे नाव Kayla Eubanks असून तिने एक ग्लॅमरस क्रॉप टॉप घातला होता आणि साउथवेस्ट एअरलाइन्सच्या माध्यमातून मंगळवारी प्रवास करणार होती. मात्र तिला गेटवर थांबवत तिच्या कपड्यांवरुन काही गोष्टी बोलण्यात आल्या.

Southwest Airlines 'forced' woman to wear 'Pilot’s shirt to cover up' (Photo Credits: Twitter)

आपण सध्या 2020 मध्ये जरी राहत असलो तरीही अशा काही गोष्टी उघडकीस येतात ज्या आपल्याला 1800 च्या काळात घेऊन जातील. याच पार्श्वभुमीवर एक महिलेला तिचे Boobs अश्लील आणि आक्षेपार्ह दिसत असल्याचे सांगत तिला पायलटची टी-शर्ट जबरदस्तीने घालण्यास भाग पाडले. या महिलेचे नाव Kayla Eubanks असून तिने एक ग्लॅमरस क्रॉप टॉप घातला होता आणि साउथवेस्ट एअरलाइन्सच्या माध्यमातून मंगळवारी प्रवास करणार होती. मात्र तिला गेटवर थांबवत तिच्या कपड्यांवरुन काही गोष्टी बोलण्यात आल्या.तिने ज्या पद्धतीचे कपडे घातले आहेत ते दुसऱ्यांना विचलित करु शकतात असे तिला सांगण्यात आले. महिलेने क्षणाचा सुद्धा विलंब न लावता तिच्या सोबत घडलेला सर्व प्रकार ट्विट आणि व्हिडिओच्या माध्यमातून सोशल मीडियात शेअर केला. कायला हिचे कपडे पाहून त्यांनी तिला पायलेटचा शर्ट घालण्यास दिला.या घटनेमुळे ट्विटरवर पुन्हा महिलेसोबत घडलेली घटना आणि तिच्या ब्रेस्टवरुन करण्यात आलेल्या वर्तवणुकीमुळे संताप व्यक्त करण्यात आला आहे.

कायला हिने ट्विटरवर असे म्हटले की, साउथवेस्ट एअरलाइन्सने माझ्या कपड्यांवरुन का अशा पद्धतीने वर्तवणुक केली. माझ्या कपड्यांमुळे फ्लाइटवर काही परिणाम होणार होता का? की अन्य पॅसेंजर किंवा पायलटवर त्याचा परिणाम होणार होता? तर कस्टमर्स विमानात कशा पद्धतीने ड्रेस कोड फॉलो करेल यासाठी पैसे दिले जातात का? अशा पद्धतीची वागणूक महिलांच्या विरोधातील आहे.

विमान कंपनीच्या ड्रेस कोडचे उल्लंघन केले अस म्हणत कायला हिला विमानात चढण्यास नकार दिला. मी माझे साउथवेस्ट एअरचा प्रवास रद्द केला कारण माझे बुब्स'अश्लील,आणि आक्षेपार्ह' होते, असे ट्विट कायला युबँक ने केले आहे.'विमानतले इतर प्रवासी माझ्या कपड्यांकडे बघून नाराज होऊ शकतात असे मला सांगण्यात आले' असे ही कायला ने लिहिले आहे.

कायला ने तिझा तो ड्रेस घातलेला फोटो ही शेअर केला आहे ज्यात तिने लो कट ब्लैक टॉप बरोबर लांब लाल स्कर्ट परिधान केला आहे.ती असे ही म्हणाली की, 'मला खरच जाणून घ्यायचे आहे की माझ्या कपड्यांचा इतर लोकांना काय अडचण होऊ शकते? माझे टॉप चा विमानावर, त्यातील प्रवास करणाऱ्या लोकांवर किंबहुना पायलट वर वर काय परिणाम होणार आहे? आपल्याकडे जे लोक विमानन प्रवास करण्यासाठी पैसे देतात त्या सगळ्यांना ड्रेस कोड आहे का?तिने वाहनाचे नियम दाखवण्याची मागणी केली परंतु गेट वर २० मिनिटे वाट पाहूनही तिला ते देण्यात आले नाही.

कायला हिने असा दावा केला आहे की, एअरलाइन्सने तिच्यासोबत गैरवर्तवणुक केली आहे. त्याचसोबत साउथवेस्ट एअरलाइन्समधील कर्मचारी तिच्याकडे आयडी मागत असल्याचे ही तिने व्हिडिओतून दाखवले आहे. या व्हिडिओला तिने 'खरंच हे अमान्य' असल्याचे कॅप्शन दिले आहे.