Photo Credit- Instagram

Saheli Rudra Troll: कंटेंट क्रिएटर सहेली रुद्र ने कोलकाता विमानतळ(Kolkata Airport)वर दिपाका पादुकोणच्या हॅप्पी न्यू इयर चित्रपटातील ‘लव्हली’ या गाण्यावर डान्स केला. त्याचा व्हिडीओ सहेली रुद्र ने तिच्या डान्सचा व्हिडीओ (Dance Video) हा इन्सटाग्रामवर टाकला आहे. त्यावर नेटकऱ्यांनी टिका करत 'प्रवाशांची गैरसोय होते' असे म्हणत चांगलेच ट्रोल केले. व्हिडीओत ती एक-दोनचा खाली पडता-पडता वाचली असे दिसत आहे. त्यावर एका नेटकऱ्याने 'नाच ये कर राही है शर्म मुझे आराही है' असे लिहिले.

पोस्ट पाहा-

दुसऱ्या यूजरने, “डान्स केल्यानंतर, तुमच्याकडे पाहणाऱ्या लोकांना कसे हाताळायचे? ते खूप लाजिरवाणे आहे.” असे लिहिले. तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिले की, “विमानतळ? पण विमानतळावर का?" . सहेलीने तिच्या व्हिडिओलाही 'गिरते गिरते बच्च गई' असे कॅप्शन दिले आहे.