OMG! सापाच्या डोक्यावर लावले वापरलेले Condom, श्वास घेण्यास मुश्किल झाल्याने तडफडू लागला साप, वाचा काय घडले पुढे?
त्याच्यासोबत एक पशुचिकित्सा अधिकारी सुद्धा आला. त्याने त्वरित सापाची सुटका केली.
मुंबईत (Mumbai) एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुंबईतील कांदिवली पूर्व (Kandivali East) भागात दिसलेला एक साप खूपच विचित्र अवस्थेत आढळला. त्याची ती अवस्था केली होती तेथीलच काही क्रूर लोकांनी. या सापाच्या डोक्यावर वापरलेले कंडोम लावण्यात आले होते. यामुळे सापाला (Snake) श्वास घेण्यास खूप त्रास होत होता. यामुळे हा जीवन-मृत्यूशी संघर्ष करताना दिसत होता. यामुळे तो तडफडू लागला. सुदैवाने हा प्रकार ज्याने प्रत्यक्षदर्शीने पाहिला त्याने त्वरित सर्पमित्राला बोलावून घेतले. त्याच्यासोबत एक पशुचिकित्सा अधिकारी सुद्धा आला. त्याने त्वरित सापाची सुटका केली. टाईम्स ऑफ इंडियानुसार सर्पमित्र मीता मालवणकर (Meeta Malvankar) यांनी सांगितलेला हा मूळ प्रसंग हा खूपच क्रूर आणि हृदय हेलावणारा होता.
ही घटना शनिवारी जवळ 8.30 च्या सुमारास घडली. कांदिवलीच्या ग्रीन मीडोज हाउसिंग सोसायटीजवळ हा साप आढळला. तेथील प्रत्यक्षदर्शींनी त्वरित सर्पमित्र मीता मालवणकर यांना फोन केल आणि त्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. मीता मालवणकरांनी सांगितले, त्यांना वैशाली तनहा यांचा फोन आला होता. ज्या सापाबद्दल माहिती दिली. मीता म्हणाल्या जेव्हा त्यांनी तो साप पाहिला तेव्हा तो एका प्लास्टिक बॅगमध्ये कव्हर केलेला दिसला मात्र जेव्हा ते त्याच्या जवळ गेल्या तेव्हाचे चित्र पाहून त्यांच्या पायाखालची जमिनच सरकली. कारण सापाच्या डोक्यावर त्यांनी वापरलेले कंडोम लावलेले पाहिले.हेदेखील वाचा- दगड भिरकावून हकलणाऱ्या व्यक्तीला कांगारु ने शिकवला धडा; पहा Viral Video
यामुळे सापाला श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यासाठी मीताने ते कंडोम काढण्यासाठी सापाला हातात पकडले. तेव्हा त्यांनी अशी शंका व्यक्त केली होती की हा चेकर कीलबॅक जातीचा साप विषारी नसतो. मात्र त्याचे दात सुईसारखे तीक्ष्ण असतात, जे डसले तर खूप त्रास होतो.
सापाला रेस्क्यू केल्यानंतर मीता मालवणकर यांनी त्या सापाला बोरीवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात घेऊन गेल्या. जेथे वन्यजीव पशु चिकित्सा अधिकारी डॉ. शैलेश पेठे यांनी सापाची स्थिती पाहिली आणि त्यावर योग्य तो इलाज केला. त्यानंतर त्याला सुरक्षितरित्या जंगलात सोडण्यात आले.
याप्रकरणी असा वन अधिका-यांनी त्या अज्ञात व्यक्तीवर ज्याने हे कृत्य केले त्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.