Snake Pulled From Woman's Mouth: झोपलेल्या महिलेच्या तोंंडात शिरला 4 फुट लांंब साप, डॉक्टरांंनी 'असा' काढला बाहेर (Watch Video)

रशिया मधील दागिस्तान या भागात एक महिला झोपलेली असताना चक्क तिच्या तोंंडात एक चार फुट लांंब साप शिरल्याची घटना समोर येत आहे.

Snake Being Pulled Out From Woman's Throat (Photo Credits: Video Screengrab/ YouTube)

Snake Inside Women's Mouth: आजवर आपण साप माणसाला डसल्याच्या, माणसाने साप शिजवुन खाल्ल्याच्या अनेक घटना ऐकल्या आहेत, पाहिल्याही असतील मात्र सध्या सापाशी संबधित एक अशी विचित्र घटना समोर आली आहे की जी वाचुन कदाचित तुम्हालाही विश्वास बसणार नाही. रशिया मधील दागिस्तान या भागात एक महिला झोपलेली असताना चक्क तिच्या तोंंडात एक चार फुट लांंब साप शिरला इतकंंच नव्हे तर हा साप अगदी गळ्यापर्यंंत पोहचला तरी या महिलेची झोप उघडली नाही, दुसरीकडे महिलेच्या घश्यात शिरताच हवा मिळत नसल्याने साप मात्र तडफडु लागला (तेव्हा कुठे या महिलेला जाग आली). या परिस्थितीने तर पहिले महिलेची चांंगलीच घाबरगुंंडी उडाली मात्र जीव वाचवण्यासाठी तिने तशीच हॉस्पिटल मध्ये धाव घेतली. या ठिकाणी डॉक्टरांंनी या सापाला शेपटी धरुन बाहेर काढले मात्र तोवर आत गुदमरुन सापाचा मृत्यु झाला होता.

तुम्ही म्हणाल की हा प्रकार ऐकुनच विश्वास न ठेवण्यासारखा आहे. खरंय आम्हाला पण सुरुवातीला असंच वाटंंल होतं मात्र या घटनेचा एक व्हिडिओ सुद्धा आता व्हायरल झाला आहे. यात डॉक्टर महिलेच्या तोंंडुन साप बाहेर काढताना स्पष्ट दिसत आहेत.

चीनी व्यक्ती च्या मेंदुत 17 वर्षांपासुन राहत होती 5 इंच लांंब अळी, डॉक्टर म्हणतात कच्चे बेडुक व साप खाल्ल्याने झाला परिणाम

महिलेच्या तोंंडात शिरला साप, पहा व्हिडिओ

दरम्यान, डॉक्टरांंनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना म्हंंटले की, अनेकांंना झोपताना तोंंड उघडे ठेवुन झोपायची सवय असते, या महिलेच्या बाबतही नकळत तेच झाले आणि तोंंड उघडे पाहुन हा साप आत शिरला आत मध्ये गेल्यावर गुदमरल्याने तो मेला आणि म्हणुन तसाच अडकुन राहिला. या घटनेनंंतर रशियाच्या हेल्थ मिनिस्ट्री कडुन लोकांंना झोपताना काळजी घ्या असे आवाहन करण्यात आले आहे.