उंदराच्या पॅडला नाग चिकटला, खोबऱ्याचे तेल वापरून कसा काढला? पाहा व्हिडिओ
हा व्हिडिओ पाहिल्यावर एका शहारे येतात तर दुसऱ्या बाजूला सापळे लावताना किंवा मुक्या प्राण्यांपासून होणारा त्रास कमी करण्यासाठी आपण किती विचित्र पद्धत वापरतो याचिही प्रचिती येते.
उंदीर (Rat) पकडण्यासाठी लोक सापळा लावतात. कोणी चिकट पॅड वापरते. जेणेकरुन या सापळ्यात उंदीर अडकावा किंवा पॅडला असलेल्या चिकटला तो चिकटून बसावा. पण, पुणे (Pune) येथील वाघोली-नगर रोड येथे एक भलताच प्रकार घडला. उंदरासाठी लावलेल्या पॅडला चक्क नाग चिकटून बसला. तो असा काही चिकटला की त्याला सोडविण्यासाठी खास सर्पमित्र पथक बोलवावे लागले. युट्युबवर हा व्हिडिओ उपलब्ध आहे. हा व्हिडिओ पाहिल्यावर शहारे येतात तर दुसऱ्या बाजूला सापळे लावताना किंवा मुक्या प्राण्यांपासून होणारा त्रास कमी करण्यासाठी आपण किती विचित्र पद्धत वापरतो याचिही प्रचिती येते.
सर्पमित्रांनी या नागाची सोडवणूक करताना सांगितले की, हा मोठा नाग नाही. हे नागाचे पिल्लू आहे. त्यामुळे उंदराच्या पॅडला चिकटले असतानाही त्यातून बाहेर पडण्याइतकी ताकत त्याच्यात नाही. त्यामुळे ते या पॅडला घट्ट चिकटले आहे. पॅडला चिकटलेला हा नाग बाहेर काढताना त्याचे शरीरही फाटण्याची शक्यता होती. परंतू, सर्पमित्रांनी खोबरेल तेलाचा वापर करुन त्याला अलगतपणे बाहेर काढले आणि त्याला जिवदान दिले. (हेही वाचा, साप चावल्यावर या 7 प्रकारे मानवी शरीरात चढते विष, होतो मृत्यू; वाचा महत्त्वपूर्ण माहिती)
सर्पमित्रांनी युट्युबवरील व्हिडिओत केलेल्या उल्लेखानुसार हा नाग पुढे सुरक्षीत ठिकाणी सोडून दिला आहे. पण, या नागाची सुटका करताना नागाचे हे पिल्लू हे ज्या पद्धतीने फणा काढते ती नागाच्या गुणाची प्रचिती देणाराच दिसतो. अनेकांना साप, नाग आदी प्रकारांची भीती वाटते. कदाचीत आपणही नागाला घाबरत असाल तर ही भीती दूर ठेऊन हा व्हिडिओ पाहायला हवा. ज्यामुळे मुके प्राणी पकडताना आपण त्यांना त्रास होणार नाही याची जाणीव घेऊ शकू.