Snake Causes Power Outage in Virginia: सापामुळे अंधार, व्हर्जिनियामध्ये वीजपुरवठा खंडित; 11,700 ग्राहक प्रभावित

ज्यामुळे किलन क्रीक, सेंट्रल न्यूपोर्ट न्यूज आणि क्रिस्टोफर न्यूपोर्ट युनिव्हर्सिटी सारख्या भागांवर परिणाम झाला. डोमिनियन एनर्जीच्या (Dominion Energy) अधिकाऱ्यांनी पुष्टी केली की ट्रान्सफॉर्मरच्या उच्च-व्होल्टेज क्षेत्रामध्ये साप घुसला आणि विद्युतपुरवठा खंडीत (Snake Causes Outage) झाला.

Snake | (Representationa Image | Photo Credits: Pixabay.com)

व्हर्जिनियामध्ये शनिवारी रात्री वीज खंडित (Virginia Power Outage) झाल्यामुळे सुमारे 11,700 ग्राहक अंधारात होते. ज्यामुळे किलन क्रीक, सेंट्रल न्यूपोर्ट न्यूज आणि क्रिस्टोफर न्यूपोर्ट युनिव्हर्सिटी सारख्या भागांवर परिणाम झाला. डोमिनियन एनर्जीच्या (Dominion Energy) अधिकाऱ्यांनी पुष्टी केली की ट्रान्सफॉर्मरच्या उच्च-व्होल्टेज क्षेत्रामध्ये साप घुसला आणि विद्युतपुरवठा खंडीत (Snake Causes Outage) झाला. ज्याचा परिसरातील नागरिकांना फटका बसला. प्राप्त माहितीनुसार, या घटनेमुळे रात्री 9:15 च्या सुमारास वीज खंडित झाली.जवळपास 6,000 पेक्षा जास्त ठिकाणी वीज खंडित झाल्याची नोंद झाली.

विद्युतपुरवठा खंडीत झाल्याची माहितीमिळताच, डोमिनियन एनर्जी क्रूने त्वरीत प्रतिसाद देत मदत आणि देखभाल दुरुस्तीचे काम सुरु केले. पहिली तक्रार प्राप्त झाल्यापासून पुढच्या केवळ दीड तासात म्हणजेच रात्री 10:30 पर्यंत सर्व प्रभावित भागात खंडीत वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला. दरम्यान, इतक्या मोठ्या प्रमाणार विद्युत पुरवठा खंडीत करणारा साप कोणत्या प्रजातीचा आहे? याबाबत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. सापाची प्रजाती अद्याप अज्ञात असली तरी, पूर्वेकडील गार्टर साप आणि पूर्वेकडील उंदीर साप (माऊस स्नेक) व्हर्जिनियामध्ये सामान्य आहेत. सापांमुळे असा त्रास होण्याची ही पहिलीच वेळ नाही. मे महिन्यात, नॅशव्हिल, टेनेसीजवळ विद्युत प्रणांलींमध्ये साप किंवा उंदीर घुसल्याने अनेक वेळा वीजपुरवठा खंडीत झाला आहे. ज्यामध्ये राखाडी उंदीर साप (Grey Rat Snakes) मोठ्या प्रमाणार आढळून आले. (हेही वाचा, UP Shocker: लग्नाच्या काही तासांपूर्वीच साप चावल्याने नवरदेवाचा मृत्यू, बुलंदशहरातील घटना)

व्हर्जिनिया हे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका मधील 50 राज्यांपैकी एक आहे. हे देशाच्या पूर्व किनाऱ्यावर, मध्य-अटलांटिक प्रदेशात आहे. व्हर्जिनियाच्या उत्तरेला मेरीलँड आणि वॉशिंग्टन, डी.सी., पूर्वेला अटलांटिक महासागर, दक्षिणेला नॉर्थ कॅरोलिना आणि टेनेसी आणि पश्चिमेला वेस्ट व्हर्जिनिया आणि केंटकी यांच्या सीमेवर आहेत. सन 1776 मध्ये ग्रेट ब्रिटनपासून स्वातंत्र्य घोषित करणाऱ्या मूळ 13 वसाहतींपैकी एक असल्याने या राज्याचा समृद्ध इतिहास आहे. अमेरिकन क्रांती आणि गृहयुद्धात या राज्याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. व्हर्जिनियाची राजधानी रिचमंड आहे आणि तिचे सर्वात मोठे शहर व्हर्जिनिया बीच आहे.

व्हर्जिनिया त्याच्या वैविध्यपूर्ण भूगोलासाठी ओळखले जाते. ज्यामध्ये पर्वत, दऱ्या आणि किनारी भागांचा समावेश आहे. कृषी, सैन्य, सरकार आणि तंत्रज्ञान यासारख्या प्रमुख उद्योगांसह त्याची मजबूत अर्थव्यवस्था आहे. व्हर्जिनियामध्ये औपनिवेशिक विल्यम्सबर्ग, मॉन्टीसेलो (थॉमस जेफरसनचे घर) आणि अनेक गृहयुद्धाच्या रणांगणांसह अनेक ऐतिहासिक खुणा आहेत.