Lockdown: बहिण आणि तिच्या मैत्रिणी मला Ludo खेळू देत नाहीत; 8 वर्षीय मुलाची केरळ पोलिसांकडे तक्रार
या मुलाने म्हटले आहे की, ते माझी खिल्ली उडवत आहे कारण मी मुलगा आहे. ते मला लुडो खेळू देत नाहीत.
लॉकडाऊन (Lockdown) काळात केरळ पोलिसांकडे एका 8 वर्षीय मुलाची असामान्य तक्रार आली आहे. या मुलाने तक्रारीत आरोप केला आहे की, त्याचे बहिण आणि तिच्या मैत्रिणी त्याला चोर-पोलीस (Police and Thief Games), लुडो (Ludo Game) खेळू देत नाहीत. त्या स्वत: मात्र लुडो खेळतात. आपणास खेळायला घेत नाहीत आणि आपली चेष्टा करतात. केरळ राज्यातील कोझिकोड (Kozhikode) येथील कसबा पोलीस स्टेशन (Kasaba Station) यथे या मुलाने तक्रार केली आहे. उमर निदार (Umar Nidar) असे या मुलाचे नाव आहे.
तक्रारदार उमर निदार याने बहिण आणि तिच्या चार मित्रांना अटक करावी अशी मागणी तक्रारीत केली आहे. या मुलाने म्हटले आहे की, ते माझी खिल्ली उडवत आहे कारण मी मुलगा आहे. ते मला लुडो खेळू देत नाहीत. तसेच मला ते चोर पोलीसही खळू देत नाहीत.पोलिसांनी सांगितले की, बहिण आणि तिच्या मित्रमैत्रीणीबद्दल त्या मुलाने वडिलाकडे तक्रार केली. वडिलांनी गमतीने त्याला म्हटले की, तू पोलिसात जा. वडिलांनी असे सांगितल्यावर हा मुलगा खरोखरच पोलिसांकडे गेला. (हेही वाचा, Lockdown: LUDO खेळाचे उदाहरण देत ठाणे पोलिसांचा हटके संदेश, 'जी सोंगटी घरात राहील ती सुरक्षित राहील')
पीटीआय ट्विट
इंग्रजी माध्यमात इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या या मुलाने केलेल्या तक्रारीची नोंद घेत दोन पोलिस अधिकाऱ्यांनी त्याच्या घरी भेट दिली आणि प्रकरणाची चौकशी केली. कसबा पोलिस स्टेशनचे सिव्हिल पोलिस अधिकारी यू पी उमेश आणि के टी टी निराज अशी या अधिकाऱ्यांची नावे. त्यांनी या मुलाला सोबत घेऊन खेळण्याबद्दल बहिणीला समजावले. त्यानंतर हा गुंता सुटला.