Siddhivinayak Mandir Viral Video: मुंबई मध्ये सिद्धिविनायक मंदिराच्या प्रसादामध्ये उंदीर आढळल्याच्या वायरल व्हिडिओ वर सदा सरवणकर यांची प्रतिक्रिया; 'प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न म्हणत आरोप फेटाळले (Watch Video)

त्याची घोषणा झाल्यापासून अनेकांनी बदनामीची कारस्थानं रचली आहेत. असा आरोप मंदिराच्या ट्रस्ट ने केला आहे.

Sada Sarvankar On prasad Clip | X @ANI

मुंबई मध्ये सिद्धिविनायक मंदिरामधील लाडवांच्या प्रसादात उंदराचा एक व्हिडिओ वायरल झाला आहे. सोशल मीडीयात सध्या हा व्हिडिओ वायरल होत असल्याने मंदिरातील प्रसादात किती साफ सफाई ठेवली जाते? याबद्दल प्रश्न विचारले जात आहे. दरम्यान यावर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष (Chairperson of Shree Siddhivinayak Ganapati Temple Trust) सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांनी आरोप फेटाळत हा प्रकार प्रतिमा खराब करण्याच्या उद्देशाने केल्याचं म्हटलं आहे.

सिद्धिविनायक मंदिराकडून माहिती देताना सदा सरवणकर यांनी या व्हिडिओ चा तपास केला जाईल पण हा व्हिडिओ मंदिरातील नाही. व्हिडिओ मध्ये दिसत असलेलं ठिकाण मंदिरातील नाही असं म्हटलं आहे. तसेच लाडू बनवण्यासाठी 25 कर्मचारी काम करत असतात. दिवस आणि रात्रीची शिफ्ट असते. या ठिकाणी अस्वच्छ्ता असते. सुरक्षा आणि स्वच्छतेचे सारे प्रोटोकॉल सांभाळले जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

सिद्धिविनायक मंदिरातील प्रसादात उत्तम पदार्थ

सदा सरवणकर यांनी प्रसादामध्ये उच्च दर्जाचे आणि स्वच्छ घटक वापरले जात असल्याचं म्हटलं आहे. यामध्ये प्रिमियम दर्जाचे तूप असतं. प्रसादातील सार्‍या घटकांना प्रयोगशाळेत तपासलं जातं तसेच यावर 3 सरकारी अधिकार्‍यांच्या देखरेखीत काम चालतं

पहा वायरल व्हिडिओ

सिद्धिविनायक मंदिराचं लवकरच रूप पालटलं जाणार आहे. त्याची घोषणा झाल्यापासून अनेकांनी बदनामीची कारस्थानं रचली आहेत. असा आरोप मंदिराच्या ट्रस्ट ने केला आहे. Tirupati Laddu Prasadam Row: तिरुपती लाडू विवादानंतर मंदिराचे झाले शुध्दीकरण; आवारात 4 तास चालला महाशांती यज्ञ (Video).  

देशात सध्या तिरूपती बालाजी मंदिरामधील प्रसादाचा वाद सुरू असताना आता सिद्धिविनायक मंदिरातील प्रसादाचा देखील व्हिडिओ वायरल झाल्याने अनेक भाविकांच्या मनात द्विधा स्थिती झाली आहे.