Shocking Viral Video: ऑटोरिक्षात चालकासह प्रवास करत होते तब्बल 27 लोक; दृश्य पाहून पोलीसही चक्रावले (Watch)

सध्या सोशल मिडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून, लोक यावर चित्रविचित्र प्रतिक्रिया देत आहेत.

Shocking Viral Video (संग्रहित संपादित प्रतिमा)

काल देशभरात बकरीदचा सण मोठ्या आनंदात पार पडला. आता उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) फतेहपूरमधून या दिवसाचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ एका ऑटोचा (Auto) आहे, ज्यामध्ये नमाज पढून परतणारे लोक बसले होते. आता तुम्ही म्हणाल त्यात काय एवढे. परंतु तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल, साधारण 4 लोक बसण्याची क्षमता असलेल्या या ऑटोमध्ये तब्बल 27 लोक बसले होते. हे प्रकरण फतेहपूरच्या बिंदकी कोतवाली भागातील लालौली चौकातील आहे.

बकरीद सणाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक चौक, रस्त्यांवर पोलीस सज्ज होते. यावेळी एक ओव्हरलोड असलेली आणि भरधाव वेगाने जात असलेली ऑटो पोलिसांना दिसली. तपासणीदरम्यान पोलिसांनी त्यांना थांबवले असता आत बसलेले लोक पाहून पोलीस चक्रावून गेले. या रिक्षामधून लहान मुलांसह एकूण 27 जणांना एक एक करून बाहेर काढण्यात आले.

हे सर्व लोक बिंदकी शहरातील पोलीस स्टेशन हद्दीतील महारा गावातील रहिवासी होते. लहान मुलांसह हे सर्व 27 जण बकरीदची नमाज अदा करून आपल्या गावाकडे जात होते. या ऑटोमध्ये 27 जण ज्या प्रकारे कोंबून भरले होते, ते पाहूनही पोलीस हादरले. ही गोष्ट वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन तर आहेच, पण उघडपणे मोठ्या अपघाताला निमंत्रण देण्यासारखे आहे. (हेही वाचा: Nagin Dance Viral Video: रोडच्यामध्ये बाइकर्सचा ट्रकच्या हॉर्नवर 'नागिन डान्स' (Watch Video))

पोलिसांनी ऑटोचालक अमजदला खडसावले आणि त्याची ऑटो ताब्यात घेण्यात आली. सध्या सोशल मिडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून, लोक यावर चित्रविचित्र प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी तर, रिक्षाला बस म्हणून घोषित करा, असा टोमणा मारला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी देशाच्या लोकसंख्येवर प्रश्न उपस्थित केले आहेत. लोकसंख्या अशीच वाढत राहिली तर लोक ऑटोमध्ये नव्हे तर ऑटोच्या टपावर बसून प्रवास करतील असे लोक म्हणत आहेत.