Shocking & Dangerous Driving Videos: एका हातात बाळ, दुसऱ्या हातात बाईकचे हँडल; धोकादायक स्थितीत Scooter चालवणाऱ्या इसमाचा व्हिडिओ व्हायरल
हा व्हिडिओ पाहून अनेकांनीच कौतुक केले आहे. पण, अनेकांनी संतापही व्यक्त केला आहे. काहींनी अत्यंत धोकादायक असेही या व्हिडिओचे ( Shocking & Dangerous Driving Videos) वर्णन केले आहे.
सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडिओ व्हायरल (Viral Videos) झाला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनीच कौतुक केले आहे. पण, अनेकांनी संतापही व्यक्त केला आहे. काहींनी अत्यंत धोकादायक असेही या व्हिडिओचे ( Shocking & Dangerous Driving Videos) वर्णन केले आहे. व्हिडिओत एक व्यक्ती रहदारीच्या रस्त्यावरुन आपली स्कुटर चालवत आहे. परंतू, ही स्कुटर चालवताना त्याने एका हाताने स्कुटरचा हँडल पकडला आहे. तर दुसऱ्या हाताने पाठीमागच्या सीटवर बसलेल्या लहान मुलाला पकडले आहे. जो दुचाकीस्वाराच्या पाठीवर डोके ठेऊन झोपला आहे.
व्हिडिओत पाहायला मिळते की, एक माणूस एका तरुण मुलासोबत स्कूटर चालवत दिसत आहे. पाठिमागे बसलेला तरुण मुलाचे डोके एका बाजूला करुन झोपाला आहे. तो मुलगा स्कूटरवरून पडू नये म्हणून दुचाकी चालवणारा माणूस त्या मुलाला त्याच्या डाव्या हाताने आधार देतो आणि उजव्या हाताने गाडी चालवतो.
अभिषेक थापा याने युजरने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेला हा व्हिडिओ 14 नोव्हेंबरला अपलोड करण्यात आला आहे. त्याने व्हिडिओसोबत कॅप्शन लिहिले आहे की, "म्हणूनच त्याला वडील म्हणतात". व्हिडिओला आतापर्यंत 32,000 हून अधिक व्ह्यूज आणि 13 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. अवघ्या काही सेकंदांचा हा व्हिडिओ इंटरनेटवर अनेकांची मने जिंकत आहे. (हेही वाचा, अगं बाई! हेल्मेट सापडत नाही, महिलेने डोक्याला घातला कुकर; छायाचित्र व्हायरल)
व्हिडिओ
व्हिडिओ पाहून कमेंट बॉक्समध्ये एका यूजरने लिहिले की, "खरंच! बापाचा हात असेपर्यंत कोणतेही टेन्शन नसते. कारण तुम्हाला माहीत आहे की वडील तुमच्या मागे आहेत." दुसर्या युजरने म्हटले आहे की, "मला अजूनही आठवतो तो हिंदी वक्तृत्वाचा दिवस जेव्हा आम्ही परत जात होतो तेव्हा खूप पाऊस पडत होता आणि आमच्याकडे फक्त एक रेनकोट होता आणि माझ्या वडिलांनी तो मला दिला होता." व्हिडिओ पाहून अनेकांना आपले बालपण आठवले आहे.