Snake Under Pillow In Nagpur: बाप रे बाप!! उशीखाली लपून बसला साप! (Watch Video)

नागपूरमध्ये एका घरातील बेडवर उशीच्या खाली लपलेला एक अत्यंत विषारी साप आढळला. परंतु, उशीखाली साप असल्याचं समजल्याने मोठा अनर्थ टळला. सर्पमित्राने या सापाला पकडले आणि त्याला जंगलात सोडून दिले.

Snake Under Pillow In Nagpur (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Snake Under Pillow In Nagpur: नागपूरमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. एका घरात उशीखाली विषारी साप सापडल्याची धक्कादायक घटना (Snake Under Pillow) घडली आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Snake Under Pillow Viral Video) होत आहे. सोशल मीडियावर लक्ष वेधून घेणाऱ्या या धक्कादायक व्हिडिओनंतर लोकांमध्ये नवीन भीती निर्माण झाली आहे. प्राप्त माहितीनुसार, नागपूरमध्ये एका घरातील बेडवर उशीच्या खाली लपलेला एक अत्यंत विषारी साप आढळला. परंतु, उशीखाली साप असल्याचं समजल्याने मोठा अनर्थ टळला. सर्पमित्राने या सापाला पकडले आणि त्याला जंगलात सोडून दिले.

या घटनेमुळे मानवाच्या सुरक्षिततेबद्दल चिंता वाढली आहे. विशेषतः पावसाळ्यात साप निवारा शोधण्यासाठी घरात आश्रय घेतात. रहिवाशांना सतर्क राहण्याचे, नियमितपणे त्यांचे बेडिंग तपासण्याचे आणि साप दिसल्यास स्थानिक सर्पमित्रांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे. (हेही वाचा - Snake Mating Dance Nagpur: दोन सापांचे मिलन, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल)

नागपुरात उशीखाली साप - 

 

View this post on Instagram

 

A post shared by ❤️❤️‍🔥दीवानी खाटू वाले की❤️‍🔥❤️ (@reenagarg_hr06_)

दरम्यान, व्हिडिओमध्ये सुमारे एक फूट लांबीचा साप उशीच्या कव्हरमध्ये लपून बसलेला दिसत आहे. सर्पमित्राने या सापाची घरातून सुटका केली आहे. व्हिडिओमध्ये एक महिला सापाला हळूवारपणे पकडण्याचा प्रयत्न करते. 'reenagarg_hr06_' वापरकर्त्याने इंस्टाग्रामवर शेअर केलेला हा व्हिडिओ सध्या सर्वत्र प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओला 468 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement