Sex Toy Stuck In Rectum: सेक्स टॉय गुदाशयात अडकल्याने 45 वर्षीय व्यक्तीस घ्यावी लागली वैद्यकीय मदत, चार दिवसांनी सुटका

वय वर्षे 45 असलेल्या या व्यक्तीने आपल्या गुदद्वारात (Rectum) सेक्स टॉय सरकवला. मात्र, थोडा वेळ लैंगिक अनुभूती घेतल्यावर अचानक त्याचे या टॉयवरील नियंत्रण सुटले आणि ते आतमध्येच अडकले .

Sex Toy Stuck in Anus

Sex Toy Stuck in Anus: लैंगिक सुख मिळविण्यासाठी सेक्स टॉय वापरणे आणि त्यावरील नियंत्रण गमावने एका गुजराती व्यक्तीच्या चांगलेच अंगाशी आले. वय वर्षे 45 असलेल्या या व्यक्तीने आपल्या गुदद्वारात (Rectum) सेक्स टॉय सरकवला. मात्र, थोडा वेळ लैंगिक अनुभूती घेतल्यावर अचानक त्याचे या टॉयवरील नियंत्रण सुटले आणि ते आतमध्येच अडकले (Sex Toy Stuck). परिणामी त्याला पोटदुखी आणि इतरही शारीरिक त्रास सहन करावा लागला. अखेर त्रास असहय्य झाल्याने त्याला डॉक्टरांकडे जाऊन वैद्यकीय मदत घ्यावी लागली.

गुदाशयाद्वारे पोटामध्ये गेलेले सेक्स टॉय पीडितास चांगलेच त्रासदायक ठरत होते. त्याला सातत्याने वेदनाही होत होत्या. फ्री प्रेस जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, सुरुवातीला आपली परिस्थिती सांगण्यास खूप लाज वाटल्याने, त्या माणसाने त्याच्या गुदाशय आणि पोटात सतत अस्वस्थता आणि सतत वेदना सहन केल्या. अखेर त्या असहाय्य झाल्याने त्याने डॉक्टरांची मदत घेतली. (हेही वाचा, Montana Sex Shop महिलांना देणार फुकटात सेक्स टॉय, कारण जाणून व्हाल हैराण)

मीडिया रिपोर्टनुसार, पीडित व्यक्तीने गाझियाबादमधील एका हॉस्पिटलला भेट दिली. जिथे त्याने डॉक्टरांना पोटात तीव्र वेदना होत असल्याचे सांगितले. एक्स-रेमध्ये पोटात दुदद्वाराच्या नलीकेत परदेशी वस्तू आढळून आली. डॉक्टरांनी सदर व्यक्तीकडे विचारणा केली असता त्याने आढेवेढे घेतले. परंतू, परिस्थीती निवारणासाठी मागिती आवश्यक असल्याने नाईलाजाने का हईना त्या व्यक्तीने सत्य परिस्थीती कथन केली. तो म्हणाला की, सेक्स टॉय चार दिवसांहून अधिक काळ अडकले होते. वापरादरम्यान त्याने त्याच्यावरील नियंत्रण गमावले होते. (हेही वाचा, Monkey Sex Toys: माणूसच नव्हे प्राणीही कामवासना तृप्तीसाठी वापरतात सेक्स टॉय आणि मिळवतात लैंगिक सूख; माकडे काय करतात? घ्या जाणून)

डॉक्टरांनी पोटात अडकलेली वस्तू काढण्यासाठी कोलोनोस्कोपी केली. शस्त्रक्रिया हा एक संभाव्य पर्याय दिसत असताना, वैद्यकीय पथकाने शस्त्रक्रियेशिवाय सेक्स टॉय काढण्यात यश मिळवले, ज्यामुळे अनेक दिवसांच्या त्रासानंतर त्या माणसाला खूप आवश्यक आराम मिळाला. गुदातील वस्तू बाहेर निघाल्याने त्याचा मार्ग मोकळा झाला.

सेक्स टॉयच्या वापराबाबत तज्ञांचा इशारा

लैंगिक खेळण्यांशी संबंधित जोखमींबद्दल वैद्यकीय तज्ञ वारंवार सावधगिरी बाळगतात. तसेच वापरकर्त्यांनाही ते अशी खेळणी वापरताना काळजीपूर्वक वापराच्या गरजेवर जोर देतात. ते अशा वस्तू खाजगी भागात ठेवण्याचे संभाव्य धोके हायलाइट करतात, ज्यामुळे गंभीर गुंतागुंत होऊ शकते.

दरम्यान, 2014 मधील एका उल्लेखनीय घटनेत, युकेमधील 50 वर्षीय व्यक्ती, निजेल विलिस याचा त्याच्या गुदाशयात सेक्स टॉय अडकल्याने त्याचा मृत्यू झाला. लाजिरवाणेपणामुळे त्याने वैद्यकीय उपचार घेणे टाळले आणि पुढे डॉक्टरी हस्तक्षेपास उशीर झाल्यामुळे त्याचा पाच दिवसांत मृत्यू झाला. गुजरातमधील हे अलीकडील प्रकरण गंभीर आरोग्य परिणाम टाळण्यासाठी तत्सम परिस्थितीत त्वरित वैद्यकीय मदत घेण्याचे महत्त्व अधोरेखित करते.