Bride Groom Viral Video: नवरीला पाहून नवरा मुलगा घाबरला; गळ्यातला हार तोडून काढला पळ, सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होतोय 'हा' व्हिडिओ

व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, लग्नात असे काही घडते की, वर मंडप सोडून पळून जातो.

Bride Groom Viral Video (PC - Instagram)

Bride Groom Viral Video: सोशल मीडियावर लग्नाशी संबंधित अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यामध्ये वधू-वरांशी संबंधित व्हिडिओ लोकांना आवडतात. लोक लग्नाच्या व्हिडिओचा प्रचंड आनंद घेतात. मात्र, सध्या लग्नाचा असा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हालाही विचार करायला भाग पडेल. हा व्हिडिओ लग्नातील मौजमजेच्या वातावरणापेक्षा थोडा वेगळा आहे. (हेही वाचा - Dangerous Wedding Photoshoot, Video: लग्नात फोटोशूट, व्हिडिओ काढण्यासाठी धक्कादायक प्रकार, वधू वराच्या कपड्यांना लावली आग)

अनेकदा लग्नाच्या वातावरणात काही विचित्र घटना घडतात. या घटनांचा कोणीही आगाऊ विचार करत नाही. या घटनांना एक प्रकारे अपघात म्हणता येईल. ज्याचा कोणीही अंदाज लावू शकत नाही. असाचं एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. यामुळे सर्वांनाचं आश्चर्याचा धक्का बसला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, लग्नात असे काही घडते की, वर मंडप सोडून पळून जातो. (हेही वाचा - Jhansi Bride Viral Video: परीक्षा देण्यासाठी लग्नाचे विधी सोडून नवरा मुलगा वधूला घेऊन पोहोचला परिक्षा केंद्रावर; पहा व्हायरल व्हिडिओ)

व्हिडीओमध्ये वधू लग्नाच्या मंडपात बसलेली दिसत आहे. दरम्यान, सिंदूर भरण्याचा सोहळा सुरू असताना वर आपल्या वधूला सिंदूर भरवतो. यादरम्यान, काहीतरी अनपेक्षित घडते. त्यानंतर नवरा मुलगा वरमाला तोडतो आणि घाबरून तेथून पळ काढतो. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मंडपात वधूसोबत घरातील अनेक महिला आहेत.

व्हिडिओ पहा-

 

View this post on Instagram

 

A post shared by Niranjan Mahapatra (@official_viralclips)

यानंतर नववधू जमिनीवर पडल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. हे पाहून वराची अवस्था बिकट होते. वराला खूप आश्‍चर्य वाटते आणि तो माला तोडतो आणि घाबरून पळू लागतो. वास्तविक, जेव्हा वराला आपल्या वधूची अवस्था दिसते तेव्हा त्याला धक्का बसतो. यानंतर तो गळ्यात घातलेला माळा काढून फेकून देतो आणि लग्नाच्या मंडपातून पळून जातो. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. निरंजन महापात्रा नावाच्या युजरने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.