Fact Check: 2000 हजारांच्या नोटा बंद होणार? 1 हजाराच्या नव्या नोटा चलनात येणार? जाणून घ्या काय आहे सत्य
या मेसेजमध्ये नोटाबंदीनंतर बाजारात आलेली 2000 हजार रुपयांची नोट 1 जानेवारी 2020 रोजी बंद होणार आहे. सरकार पुन्हा एकदा 1 हजार रुपयांची नोट आणण्याची तयारी करत आहे, असा दावा करण्यात आला आहे. या मेसेजमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचाही उल्लेख आहे. चला तर मग या खास लेखातून याबाबतीतील सत्यता जाणून घेऊयात.
सध्या सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये नोटाबंदीनंतर बाजारात आलेली 2000 हजार रुपयांची नोट 1 जानेवारी 2020 रोजी बंद होणार आहे. सरकार पुन्हा एकदा 1 हजार रुपयांची नोट आणण्याची तयारी करत आहे, असा दावा करण्यात आला आहे. या मेसेजमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचाही उल्लेख आहे. चला तर मग या खास लेखातून याबाबतीतील सत्यता जाणून घेऊयात.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या मेसेजनुसार, रिझर्व बँक ऑफ इंडिया 1 जानेवारी 2020 पासून 1 हजारच्या नव्या नोटा बाजारात आणणार आहे. तसेच 2000 रुपयांच्या सर्व नोटा परत घेतल्या जाणार आहे. नागरिकांना फक्त 50 हजार रुपयांपर्यंतच्या नोटाच बदलता येऊ शकतात. त्यामुळे लवकरात लवकर या नोटा बदला, असं सांगण्यात आलं आहे. हा मेसेज वाचून अनेकजण गोंधळात पडले आहेत. परंतु, आम्ही याबाबत अधिक तपास करून सत्य काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. (हेही वाचा - अबब! अमेरिकेत एक केळ विकले 85 लाखाला; फोटो होतोय व्हायरल)
हे आहे सत्य -
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा मेसेज केवळ एक अफवा आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया तसेच इतर बँकांनी 2 हजारच्या नोटा चलनातून बंद झालेल्या नाहीत, हे स्पष्ट केलं आहे. काही दिवसांपूर्वी रिझर्व बँक ऑफ इंडियाने सांगितलं होतं की, 2 हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद झाली आहे. मात्र, बाजारात असलेल्या 2 हजार रुपयांच्या नोटा बंद केलेल्या नाहीत. यावेळी आयबीआयने 2 हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याचा कोणताही आदेश जारी केला नसल्याचही स्पष्ट केलं आहे. त्यामुळे अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. आरबीआयने काही बदल केले तर बँक आपल्याला जाहीरपणे याबद्दल माहिती देत असते.
दरम्यान, या मेसेजमधील आणखी एक दावा करण्यात आला आहे. त्यात रिझर्व्ह बँक 1000 रुपयांची नोट बाजारात आणणार असल्याचंही म्हटलं आहे. परंतु, हा दावाही खोटा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला होता. त्यामुळे जुन्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून हद्दपार झाल्या होत्या. तसेच तेव्हापासून 500 आणि 2000 रुपयांच्या नव्या नोटा चलनात आल्या आहेत.