Ratan Tata Driving Mercedes Benz SL500 Video: रतन टाटा मर्सिडीज बेंझ चालवतानाचा जुना व्हिडिओ पुन्हा व्हायरल
शिवाय, त्यांचे व्यवस्थापन आणि उत्साह हा देखील अनेकांसाठी प्रेरणा आणि उत्सुकतेचा विषय असतो. रतन टाटा (Ratan Tata Video) यांचा एक असाच जुना व्हिडिओ सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल झाला आहे. ज्यात ते कनव्हर्टेबल मर्सिडीज-बेंझ SL500 चालवताना दिसतात.
भारतातील सर्वात प्रसिद्ध उद्योगपतींमध्ये पहिल्या क्रमांकावर असलेल्या रतन टाटा (Ratan Tata) यांचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. टाटा समूहाचे माजी अध्यक्ष असलेले रतन टाटा (Ratan Tata) हे नेहमीच त्यांचे विश्वास, परोपकार आणि दानधर्मासाठी ओळखले जातात. शिवाय, त्यांचे व्यवस्थापन आणि उत्साह हा देखील अनेकांसाठी प्रेरणा आणि उत्सुकतेचा विषय असतो. रतन टाटा (Ratan Tata Video) यांचा एक असाच जुना व्हिडिओ सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल झाला आहे. ज्यात ते कनव्हर्टेबल मर्सिडीज-बेंझ SL500 चालवताना दिसतात.
रतन टाटा यांचे ऑटोमोबाईल क्षेत्रावर असलेले प्रेम नेहमीच अनेकांसाठी कौतुकाचा विषय असतो. वयाची 85 वर्षे पार केलेल्या या उद्योगपतीची आजही लोकांमध्ये मोठी क्रेझ आहे. रतन टाटा यांच्याकडे अनेक विदेशी कार आहेत. अनेक वेळा ते मुंबईच्या रस्त्यांवर फिरताना दिसले आहेत. व्हायरल व्हिडिओत ते मर्सिडीज-बेंझ SL500 चालवताना दिसतात. (हेही वाचा, Ratan Tata यांना HSNC विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट प्रदान)
व्हायरल व्हिडिओमध्ये रतन टाटा सिल्व्हर रंगाच्या कन्व्हर्टीबल कार चालवताना दिसतात. ज्याचा व्हिडिओ सोबतच्या कारमधून चित्रीत करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये रतन टाटा चालवत असलेल्या मर्सिडीज-बेंझ SL500 मध्ये 5.0-लिटर V8 इंजिन आहे जे 300 bhp पेक्षा जास्त आणि 500 Nm पेक्षा जास्त टॉर्क निर्माण करते. रतन टाटा हे कन्व्हर्टीबल कारचे मोठे चाहते आहेत. मर्सिडीज-बेंझ SL500 ही त्यांच्या संग्रहातील एकमेव कन्व्हर्टीबलकार नाही. टाटा यांच्याकडे फेरारी कॅलिफोर्निया, कॅडिलॅक एक्सएलआर आणि क्रिस्लर सेब्रिंग यांसारख्या कार देखील आहेत. रतन टाटा हे भारतातील फेरारी कॅलिफोर्नियाचे पहिले मालक होते.
ट्विट
या विदेशी गाड्यांव्यतिरिक्त रतन टाटा यांच्याकडे टाटा नेक्सन, टाटा इंडिगो मरिना, मर्सिडीज-बेंझ एस-क्लास, कस्टम बिल्ट टाटा नॅनो ईव्ही आणि काही इतर वाहने आहेत.