Raksha Bandhan 2020: रक्षाबंधन चे निमित्त साधत सुदर्शन पटनायक यांंनी 'हा' संंदेश देत साकारलं सुंंदर Sand Art

ओडिशा (Odisha) मधील पुरी (Puri) इथल्या समुद्र किनाऱ्यावर सुदर्शन यांनी राखी च्या रुपात एक वाळु शिल्प (Sand Art) साकारले आहे.

Raksha Bandhan 2020 Sand Art (Photo Credits: Twitter/Sudarshan Pattnaik)

आज 3 ऑगस्ट रोजी देशभरात रक्षाबंधनाचा (Raksha Bandhan 2020) पवित्र सण साजरा केला जाईल, कोरोना (Coronavirus) संंकट असंंल तरी घरगुती पद्धतीने का होईना सेलिब्रेशन मात्र जोरदार होणार यात काहीच शंका नाही. या दिवसाचे औचित्य साधत सकाळपासुन पंंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) तसेच राष्ट्रपती रामनाथ कोविंंद (President Ramnath Kovind)  यांच्या सह अनेकांंनी सोशल मीडियावरुन शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभुमीवर पद्मश्री विजेते सुदर्शन पटनायक (Sudarshan PAttnaik) यांनी सुद्धा आपल्या खास अंदाजात रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ओडिशा (Odisha) मधील पुरी (Puri) इथल्या समुद्र किनाऱ्यावर सुदर्शन यांनी राखी च्या रुपात एक वाळु शिल्प (Sand Art) साकारले आहे. हे केवळ शिल्प नसुन या माध्यमातुन सुदर्शन यांनी कोविड वॉरिअर्सचा (COVID Warriors) सुद्धा खास सन्मान केला आहे.

सुदर्शन यांनी वाळुशिल्प साकारताना आपण आजचा रक्षाबंंधन सण हा कोविड वॉरिअर्स सोबत साजरा करुयात असा संंदेश दिला आहे. या वाळुशिल्पात डॉक्टर, पोलिस, सफाई कर्मचारी, शिक्षक अशा प्रतिकृती साकारण्यात आल्या आहेत. या वाळु शिल्पाचा फोटो आपल्या सोशल मीडिया वर शेअर करुन सुदर्शन यांनी सर्वांना रक्षाबंंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (Raksha Bandhan 2020: रक्षाबंधन निमित्त लॉकडाऊनमध्ये यंदा बहिणीसाठी ‘गिफ्ट’ घेण्याचा विचार करताय? या Gifts आयडिया ठरतील खास)

सुदर्शन पटनायक रक्षा बंधन विशेष वाळु शिल्प

दरम्यान, आज रक्षा बंधनाच्या सोबत श्रावणी सोमवारचा सुद्धा योग जुळुन आला आहे. भगवान शंकराची पुजा करत यादिवशी अनेक भाविक श्रावणी सोमवार व्रत करतात, याही दिवसाच्या निमित्ताने सुदर्शन यांनी श्री शंंकराच्या रुपाचे साकारलेले वाळुशिल्प सुद्धा शेअर केले आहे. सुदर्शन हे सर्व सणांंच्या तसेच सार्वजनिक मुद्द्यांना धरुन आपल्या कलेचे असे प्रदर्शन करत असतात. त्यांंचा सोशल मीडियावर सुद्धा मोठा चाहतावर्ग आहे.