Python Swallows Nilgai Calf-Video: थरारक व्हिडिओ; अजगराने गिळले नील गाईचे वासरु
दरम्यान, गावकऱ्यंना या घटनेची माहिती कळताच गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. गर्दीमुळे गलका वाढला. अजगरला याची चाहूल लागताच तो धानाच्या शेतात जाऊ लागला.
Viral Video Of Python: उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) येथे एका अजगराने चक्क नील गाईचे वासरु (Python Swallows Nilgai Calf) गिळल्याचे पाहायला मिळाले. हा अजगर तब्बल 18 फूट लांबचा होता.वासराला गिळल्यावर एखाद्या भल्यामोठ्या पोत्यात कापूस अथवा तस्तम वस्तू भरावे तसे अजगराचे पोट दिसत होते. हा अगजगर (Python ) जागेवर निपचीत पडून होता. अजगराने नीलगाईचे ((Blue Bull) वासरु गिळल्याचे स्थानिकांच्या लक्षात येताच बघ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली. ही घटना फतेहपूर (Fatehpur) जिल्ह्यातील कटोघन गाव परिसरात रविवारी सकाळी घडली.
काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, त्यांनी अजगराने वासरु गिळताना प्रत्यक्ष पाहिले. सुरुवातीला अजगराने वासराचे पाय तोंडात पकडले. मात्र, हळूहळू अजगर अजगराने संपूर्ण वासरु गिळले. धक्कादायक घटना पाहून गावकऱ्यांचा थरकाप उडाला. परंतू, इच्छा असूनही त्यांना वासरु वाचवता आले नाही. ही घटनाच इतकी भयानक होती की, गावकऱ्यांचे पुढे जाण्याचे धाडसच झाले नाही.
वासरु गिळल्यानंतर अजगर जागेवरच निपचीत पडून होता. दरम्यान, गावकऱ्यंना या घटनेची माहिती कळताच गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. गर्दीमुळे गलका वाढला. अजगरला याची चाहूल लागताच तो धानाच्या शेतात जाऊ लागला. दरम्यान, गावकऱ्यांनी वन विभागाला या घटनेची माहिती दिली. (हेही वाचा, राजस्थान येथे 13 फूट लांब अजगराने कुत्र्याला गिळले, पहा व्हिडिओ)
अजगराने गिळले वासरु (व्हिडिओ)
वन विभागाचे अधिकारी सच्चिदानंद यांनी सांगितले की, अनेकदा शिकारीच्या उद्देशाने अनेक वन्यजीवर आपल्या नेहमीच्या परिसरातून बाहेर पडतात. शिकार झाली की ते पुन्हा आपल्या परिसरात निघून जातात. कधीकधी हे प्राणी भरकटतात आणि मानवी परिसरात घुसतात. आम्ही वन विभागाचे एक पथक संबंधित परिसरात पाठवले आहे. जर गावकऱ्यांना काही समस्या असतील तर अजगराचा शोध घेऊन त्यास इतर ठिकाणी स्थानांतरीत केले जाईल, अशी माहितीही सच्चिदानंद यांनी दिली.