Priti Paswan Viral Video: प्रीती पासवान यांचा 1 मिनिट 48 सेकंदांचा व्हिडिओ का होतोय व्हायरल? सायबर तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सध्या प्रीती पासवान यांचा 1 मिनिट 48 सेकंदांचा एक व्हिडिओ प्रचंड ट्रेंड होत आहे. मात्र, या ट्रेंडचा गैरफायदा घेऊन सायबर गुन्हेगार युजर्सना फिशिंग स्कॅमचे लक्ष्य बनवत असून सायबर तज्ज्ञांनी याबद्दल धोक्याचा इशारा दिला आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सध्या प्रीती पासवान नावाच्या एका व्यक्तीशी संबंधित व्हिडिओ प्रचंड चर्चेत आला आहे. विशेषतः एक्स (पूर्वीचे ट्विटर), टेलिग्राम आणि रेडिट यांसारख्या माध्यमांवर १ मिनिट ४८ सेकंदांची एक क्लिप मोठ्या प्रमाणावर शोधली जात आहे. हा व्हिडिओ अचानक ट्रेंडमध्ये आल्यामुळे इंटरनेट युजर्समध्ये याबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र, याच लोकप्रियतेचा गैरफायदा घेऊन सायबर गुन्हेगार आणि स्कॅमर्सनी युजर्सना फसवण्यासाठी जाळे पसरवले आहे.
स्कॅमर्स कशा प्रकारे करत आहेत फसवणूक?
हा व्हायरल व्हिडिओ पाहण्याच्या उत्सुकतेपोटी अनेक युजर्स इंटरनेटवर याच्या लिंक शोधत आहेत. स्कॅमर्सनी नेमकी हीच संधी साधून सोशल मीडिया आणि सर्च इंजिन्सवर अनेक बनावट लिंक्स पसरवल्या आहेत. 'फुल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा' अशा आकर्षक ओळी लिहून या लिंक्स शेअर केल्या जात आहेत. युजर्सने या लिंकवर क्लिक केल्यास त्यांना अधिकृत व्हिडिओऐवजी धोकादायक आणि संशयास्पद वेबसाईट्सवर पाठवले जाते.
फिशिंग आणि मालवेअरचा मोठा धोका
सायबर सुरक्षा तज्ज्ञांच्या मते, या व्हायरल व्हिडिओच्या नावाखाली पसरवल्या जाणाऱ्या बहुतांश लिंक्स या 'फिशिंग' (Phishing) प्रकारातील आहेत. या लिंक्सवर क्लिक केल्यामुळे युजर्सच्या फोन किंवा लॅपटॉपमध्ये नकळतपणे मालवेअर आणि व्हायरस डाउनलोड होऊ शकतात. काही लिंक्स युजर्सना त्यांची वैयक्तिक माहिती, जसे की सोशल मीडियाचे पासवर्ड किंवा बँक खात्याचे तपशील भरण्यास भाग पाडतात. यामुळे युजर्सचे अकाउंट हॅक होण्याचा किंवा आर्थिक फसवणूक होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.
युजर्सनी कोणती काळजी घ्यावी?
अशा प्रकारच्या ट्रेंड्सपासून सुरक्षित राहण्यासाठी युजर्सनी अत्यंत सावध राहणे गरजेचे आहे. कोणत्याही अनोळखी व्यक्तीने किंवा संशयास्पद अकाउंटने शेअर केलेल्या लिंकवर क्लिक करणे टाळावे. विशेषतः टेलिग्राम ग्रुप्स किंवा एक्सवरील कमेंट्समध्ये येणाऱ्या लिंक पूर्णपणे असुरक्षित असू शकतात. इंटरनेटवर कोणताही कथित व्हायरल व्हिडिओ शोधण्यापेक्षा स्वतःच्या डिजिटल सुरक्षेला प्राधान्य देणे आणि आपली वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.