Ponytails Ban: 'मुलींना पोनीटेलमध्ये पाहून मुले उत्तेजित होतात', असे म्हणत शाळेने पोनीटेलवर बंदी घातली

जपान मधील एका शाळेत पोनीटेलवर बंदी घालण्यात आली आहे.

जपानमध्ये मुलींशी संबंधित एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. जपान मधील एका शाळेत पोनीटेलवर बंदी घालण्यात आली आहे.जपानच्या शाळेकडून विचित्र युक्तिवाद करण्यात आला आहे. शाळेच्या म्हणण्यानुसार, 'मुलींना पोनीटेलमध्ये पाहून पुरुष उत्साहित होतात.' त्यामुळे जपानमधील या शाळेतील मुली पोनीटेल बनवून शाळेत जाऊ शकत नाहीत. मुली फक्त पांढऱ्या रंगाचे अंतर्वस्त्र घालू शकतात. शाळेचा असा विश्वास आहे की विद्यार्थिनींच्या मानेचा मागील भाग विद्यार्थ्यांना लैंगिक उत्तेजन देऊ शकतो. विद्यार्थिनींनी केवळ पांढऱ्या अंतर्वस्त्र घालूनच शाळेत यावे, जेणेकरून अंतर्वस्त्र ड्रेसमधून दिसू नये, असा नियम आहे. मुलींच्या केसांचा रंग काळाच असावा. जर विद्यार्थ्याचे केस काळे किंवा सरळ नसतील तर त्यांना ते सिद्ध करण्यास भाग पाडले जाते.

जपानच्या विद्यार्थ्यांना हे नियम पाळण्याशिवाय पर्याय नाही. जपानमधील फुकुओका प्रांतातील 10 पैकी एका शाळेने मुलींच्या पोनीटेल केशरचनांवर बंदी घातल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. पोनीटेल्सवर बंदी घालणे हे लिंगभेदासारखेच आहे आणि त्यामुळे मुलींच्या अभिव्यक्तीच्या अधिकाराला खीळ बसते असे अनेकांचे मत आहे.

जपानमध्ये आता निदर्शने सुरू झाली आहेत. या ड्रेसकोडवर पालक आणि मुली आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी पुढे येत आहेत. वास्तविक, असे नियम जपानमध्ये 1870 मध्ये बनवण्यात आले होते. तेव्हापासून हे नियम पाळले जात आहेत. जपानमध्ये काही शाळांचे नियम थोडेसे बदलण्यात आले आहेत. या नियमांना 'ब्लॅक रुल्स' म्हणतात.