Poisonous Snakes in India: भारतातील विषारी फुरसे साप Shipping Container च्या माध्यमातून इंग्लंडला पोहोचला

भारतातील एक शिपींग कंटेनर (Shipping Container) इंग्लंडला रवाना झाला. या कंटनेरमध्ये हा साप (Venomous Snake) कर्मचाऱ्यांच्या नकळत शिरला. कंटनेर जेव्हा इंग्लंडमध्ये पोहोचला तेव्हा उपस्थितांना सापाबद्दल माहिती मिळाली. साप पकडण्यासाठी पशुवैद्यकीय विभागातून सर्पतज्ज्ञांना बोलावण्यात आले.

Echis Carinatus | (Photo Credits: Facebook)

भारतातील विषारी साप (Poisonous Snakes in India) थेट इंग्लंडमध्ये पोहोचला आहे. सापाने इतका दूरवरचा प्रवास केल्याने अनेकांना आश्चर्य वाटण्याची शक्यता नाकारता येत नाही. फुरसे (Saw-Scaled Vipers) जातीच्या या सापाने हा प्रवास जमीनीवरुन किंवा पाण्यातून स्वत: जाणीवपूर्वक केला नाही. तर, तो त्याच्याकडून झाला आहे. भारतातील एक शिपींग कंटेनर (Shipping Container) इंग्लंडला रवाना झाला. या कंटनेरमध्ये हा साप (Venomous Snake) कर्मचाऱ्यांच्या नकळत शिरला. कंटनेर जेव्हा इंग्लंडमध्ये पोहोचला तेव्हा उपस्थितांना सापाबद्दल माहिती मिळाली. साप पकडण्यासाठी पशुवैद्यकीय विभागातून सर्पतज्ज्ञांना बोलावण्यात आले. इंग्लंडमधील साऊथ एसेक्स वाईल्डलाईफ हॉस्पिटलने फेसबुक पोस्ट द्वारे ही माहिती दिली.

फेसबुक पोस्टनुसार, इंग्लंडमधील साऊथ एसेक्स वाईल्डलाईफ हॉस्पिटलला एक साप पकडण्यासाठी बोलावण्यात आले होते. हा साप एका कंटेनरमध्ये होता. हा कंटेनर भारतातून आला होता. बीबीसीने दिलेल्यावृत्तात म्हटले आहे की, एका कर्मचाऱ्याला हा साप टेकडीवर उभ्या असलेल्या कंटेनरमध्ये मिळाला. रुग्णालयाने एक टीम पाठवली. यात एका सर्पतज्ज्ञाचा आणि एका पशुचिकित्सकाचा समावेश होता. टीमने लगेचच ओळखले की हा साप इंग्लंडमध्ये आढळत नाही. फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, इंग्लंडमध्ये आढळत असलेल्या वन्यजीवांच्या प्रजातीशिवाय आज आम्हाला एका वेगल्या सापाबाबत माहिती मिळाली. हा साप नक्कीच वेगळ्या प्रदेशात होता. ज्या प्रदेशात त्याने असायला हवे होते त्याच्या ऐवजी तो वेगळ्याच ठिकाणी होता. (हेही वाचा, World Snake Day 2021: जगातील 'हे' 5 विषारी साप जर चावले तर अवघ्या काही मिनिटात जाऊ शकतो जीव)

फेसबुक पोस्ट

हा साप एक जगातल्या विषारी सापापैकी एक आहे. रुग्णालयाने म्हटले आहे की, या सापाची ओळख फुरसे (Saw-Scaled Vipers) या प्रकारात झाली आहे. हा साप अत्यंत विषारी आहे. हा साप अत्यंत विषारी असून, त्याचा दंश झाल्यास माणसाचा मृत्यू होण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचेही हॉस्पीटलने लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. आम्ही सापाला मानवी संपर्कापासून दूर ठेवण्यात आले आहे. सोशल मीडियावर या प्रकाराची जोरदार चर्चा आहे. एका युजरने म्हटले आहे की, टीमने चांगले केले. साप एक चांगला प्राणी आहे. दुसऱ्या युजरने म्हटले आहे की, मी सापाचा चाहता नाही. पण साप सुरक्षीत आहे हे पाहून मला छान वाटले.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now