Dog Attack in Kanpur: Pitbull ने गायीवर केला हल्ला; 5 मिनिटे दाबून ठेवला जबडा, Watch Video

लाठ्या-काठ्या घेऊन अनेकजण गाईची सुटका करण्याचा प्रयत्न करत आहेत, हे व्हिडिओमध्ये दिसत आहे. खुद्द पिटबुलचा मालकही लोखंडी रॉड घेऊन गायीला पिटबुलपासून मुक्त करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, त्यानंतरही पिटबुल गायीला त्याच्या तावडीतून सोडत नाही.

Dog Attack in Kanpur: Pitbull ने गायीवर केला हल्ला; 5 मिनिटे दाबून ठेवला जबडा, Watch Video
Dog Attack on Cow (PC - Twitter)

Dog Attack in Kanpur: उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ आणि गाझियाबादमध्ये पिटबुल (Pitbull) च्या हल्ल्याच्या बातम्या येत असताना, आज कानपूर (kanpur) मध्ये पिटबुलने गायीवर हल्ला केला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक पिटबुल आपल्या जबड्याने गाईचे तोंड अशा प्रकारे पकडताना दिसत आहे की, अनेक लोकांच्या प्रयत्नांनंतरही तो आपली पकड सोडत नाही.

लाठ्या-काठ्या घेऊन अनेकजण गाईची सुटका करण्याचा प्रयत्न करत आहेत, हे व्हिडिओमध्ये दिसत आहे. खुद्द पिटबुलचा मालकही लोखंडी रॉड घेऊन गायीला पिटबुलपासून मुक्त करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, त्यानंतरही पिटबुल गायीला त्याच्या तावडीतून सोडत नाही. खूप प्रयत्नानंतर पिटबुलने गायीचा जबडा सोडला. या घटनेत गाय जखमी झाली आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 22, 2022 05:52 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).