Fact Check: कोव्हिड 19 चा भारतातील उच्चांक नोव्हेंबरच्या मध्यावर होईल असा दावा करणारा अभ्यास ICMR ने केलेला नाही; PIB Fact Check ने केला खुलासा

COVID19 आजाराचा भारतातील उच्चांक नोव्हेंबरच्या मध्यावर होईल जेव्हा आयसीयू खाटा आणि व्हेंटिलेटर यांची कमतरता जाणवेल अशा आशयाचं वृत्त वायरल होत आहे.

Corona Peak In India In Nov| Photo Credits: Twitter/@PIBFACTCheck

भारतामध्ये आज सलग तिसर्‍या दिवशी 11 हजारापेक्षा अधिक रूग्ण आढळत असल्याने सामान्यांमध्ये आता या आजाराची दहशत वाढत आहे. दरम्यान अशातच COVID19 आजाराचा भारतातील उच्चांक नोव्हेंबरच्या मध्यावर होईल जेव्हा आयसीयू खाटा आणि व्हेंटिलेटर यांची कमतरता जाणवेल अशा आशयाचं वृत्त वायरल होत आहे. मात्र आज (15 जून) PIB Fact Check या भारत सरकारच्या माहिती व प्रसारण केंद्राच्या ट्वीटर अकाऊंट वरून हे वृत्त फेटाळण्यात आलं आहे. दरम्यान ही बातमी दिशाभूल करणारी आहे. हा रिपोर्ट ज्या अभ्यासावर आधारित आहे तो आयसीएमआर (ICMR) ने केलेला नाही आणि अधिकृत माहिती दर्शवत नाही. असं स्पष्ट करण्यात आलं आहे. Fact Check: देशात पुन्हा सक्तीने लॉकडाऊन लागू होणार? जाणून घ्या व्हायरल पोस्ट मागील सत्य.

दरम्यान आज आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासामध्ये कोरोनाची लागण झालेले 11,502 नवे रूग्ण समोर आले आहेत. तर देशात 325 जणांचा मृत्यू हा कोरोनामुळे झाला आहे. दरम्यान सध्या देशात 153106 अ‍ॅक्टिव्ह रूग्ण असून 169798 जणांवर उपचार झाले आहेत. तर 9520 जणांची कोरोना विरूद्धची लढाई अयशस्वी ठरल्याने त्यांचा जीव गेला आहे. त्यामुळे देशात एकूण कोव्हिड 19 ची लागण झालेल्यांचा आकडा 332424 वर पोहचला आहे.

PIB Tweet

मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहता सरकार पुन्हा संपूर्ण लॉकडाऊन जाहीर करण्याची शक्यता असल्याचही वृत्त व्हायरल झालं होतं. मात्र सरकारने हे स्पष्ट केले आहे की सध्या सरकारने जाहीर केलेल्या आदेशानुसार भारतात 30 जून पर्यंत पाचव्या टप्प्यातील लॉकडाऊन सुरू राहील आणि अनलॉक 1 प्रमाणे मुभा मिळणार आहे.

काही दिवसांपूर्वी एम्सचे (All India Institute of Medical Sciences) संचालक रणदीप गुलेरिया (Randeep Guleria) यांनी भारतामध्ये जून- जुलै 2020 मध्ये कोरोना बाधितांचा आकडा उच्चांक गाठेल असा अंदाज व्यक्त केला होता.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif