Agra Shocker: धक्कादायक! हरियाणातील पर्यटक ताजमहाल टूरचा आनंद घेत असताना बंद कारमध्ये पाळीव कुत्र्याचा मृत्यू; Watch Video

पोलिसांनी कार जप्त केली असून हरियाणास्थित पर्यटकांविरुद्ध प्राण्यांच्या क्रूरतेबद्दल एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

Dog | Image used for representational purpose (Photo Credits: ANI)

Agra Shocker: अमृतसरमधील एका डॉक्टरने त्याच्या पाळीव कुत्र्यांना जवळपास सहा महिने घरात बंदिस्त ठेवल्यानंतर, अशीच आणखी एक भयानक घटना समोर आली आहे. आग्रा येथील ताजमहालला भेट देताना हरियाणा-स्थित पाळीव प्राण्याच्या मालकाने त्याच्या कुत्र्याला कारमध्ये बंद केले. पाणी न मिळाल्याने आणि श्वास न मिळाल्याने पार्किंगमध्ये लावलेल्या कारणध्ये कुत्र्याचा मृत्यू झाला.

ऐतिहासिक वास्तूच्या पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकाने कुत्र्याला निष्काळजीपणे कारमध्ये सोडले. कुत्र्याला श्वास न घेता आल्याने त्याचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. आजूबाजूच्या लोकांनी त्यांच्या फोनमध्ये कुत्र्याचा व्हिडिओ काढला. या व्हिडिओमध्ये कुत्रा कारमध्ये सीटजवळ पडलेला दिसत आहे.vव्हायरल फुटेजची दखल घेत यूपी पोलिसांनी आग्रा विभागाला या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. पोलिसांनी कार जप्त केली असून हरियाणास्थित पर्यटकांविरुद्ध प्राण्यांच्या क्रूरतेबद्दल एफआयआर नोंदवण्यात आला आहे. (हेही वाचा - Viral Video: एकाच दुचाकीवर 7 मुलांना घेऊन जाणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी केली वडिलांना अटक, Watch)

वृत्तानुसार, पाळीव कुत्र्याची साखळी हँडब्रेकमध्ये अडकली ज्यामुळे त्याच्या गळ्यात फास घट्ट झाला असावा. असा प्राथमिक अंदाजही वर्तवण्यात येत आहे. मृत्यूचे कारण शोधण्यासाठी शवविच्छेदन सुरू असून या संदर्भात तपास सुरू आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif